मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटिस esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा

धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करू नये

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करू नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून बजावण्यास सुरवात झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी या नोटिसांचा आदर करत, परवानगी घेऊनच महाआरती करण्याची भूमिका घेतली आहे.

शहर आणि भिंगार उपनगरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठविण्यास सुरवात केली आहे. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी फौजदारी न्यायप्रक्रिया संहितेच्या कलम १४९ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करू नये. आंदोलनात्मक कार्यक्रम करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरण्यात येईल. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू नये. घोषणा-प्रतिघोषणांमुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. त्यातून क्षुल्लक कारणानेही तणाव निर्माण होऊ शकतो. शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नोटिसीद्वारे करण्यात आले आहे.

सदरच्या नोटिसा या न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पुढेही सुरूच राहणार आहे.

- अनिल कातकाडे, पोलिस उपअधीक्षक, अहमदनगर शहर

मनसे पदाधिकारी महाआरती करण्यासाठी परवानगी घेत आहेत. ज्या ठिकाणी परवानगी दिली जाईल, त्या ठिकाणी महाआरती करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखली जाईल.

- सचिन डफळ, नेते, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT