fraud esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : एका फ्लॅटची दोघांना विक्री करुन १५ लाखांची फसवणूक

रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट खरेदी केला होता.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री करत 15 लाख रूपयांची फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. आरोपी रामहरी मारुती शिरोळे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर शहरातील औरंगाबाद रस्त्यावरील अभियंता कॉलनीत राहणाऱ्या राणी तिम्मराज यांनी फिर्याद दिली आहे. (Ahmednagar Crime News)

रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी अहमदनगरमधील एका बॅंकेत सोनेतारण कर्ज घेऊन 10 लाख रुपये रोख शिरोळे यास दिले होते. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर नावाची नोंदणी झाल्यावर पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबतचे नोटरी व साठेखत शिरोळे याने फिर्यादी महिलेस करुन दिले होते.

त्यानंतर खरेदीखत करण्यासाठी शिरोळे याच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही खरेदीखत करून देण्यास नकार दिला. फिर्यादी यांना या व्यवहाराबाबत शंका आली. त्यांनी सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता, फ्लॅट पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेला त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी सावेडीच्या तलाठी कार्यालयात जाऊन सदरील जागेबाबत चौकशी केली असता, सदरचा फ्लॅट हा शिरोळे याने यापूर्वीच ता. 3 एप्रिल 2019 रोजी सुभाष विश्‍वास बाबर नावाच्या व्यक्तीला विकला असल्याचे कागदपत्रावरून सिद्ध झाले. फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने नोटरी व साठेखत करून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT