crop  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : रब्बीची केवळ १५ टक्केच पेरणी; ज्वारीसह गव्हाचेही क्षेत्र घटणार

खरिपात पाऊस पडेल या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

अहमदनगर - जिल्ह्यात खरिपाप्रमाणेच रब्बीतही धूळपेरणी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. अपुऱ्या पावसावर झालेल्या ओलीवरच काही शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली आहे. मान्सून परतल्यावरही शेतकऱ्यांना पावसाची आस आहे. यंदाच्या मोसमात ज्वारीचे क्षेत्र घटणार आहे.कर्जत-जामखेड हे तालुके ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात. तेथेही शेवटच्या टप्प्यातील पावसावरच शेतकऱ्यांनी तुरळक पेरा केला.

खरिपात पाऊस पडेल या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. आताही तीच स्थिती आहे. परंतु परतीच्या मान्सूनचीही आशा मावळली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. तरीही आतापर्यंत ज्वारीची पेरणी ४४ हजार हेक्टर टक्के झाली. हे प्रमाण सरासरीच्या केवळ १६ टक्केच आहे. रब्बीसाठी ज्वारीचे २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर ग्राह्य धरले जाते. गव्हासाठी ८६ हजार ४०४ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ १४ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद आहे. टक्केवारीत हे प्रमाण ०.०२ टक्के आहे. गव्हाच्या पेरणीसाठी अद्यपि अवकाश असल्याने हे प्रमाण नगण्य दिसते. ज्वारीची पेरणी ऑक्टोबरअखेरपर्यंतच होते. त्यात आतापर्यंत केवळ १६ टक्के पेरणी झाल्याने आपसूक हे प्रमाण घटणार आहे.

रब्बीत मक्याचीही पेरणी होते. हरभऱ्यासह इतर कडधान्याची पेरणीही ९.८५ टक्के आहे. ती पेरणी ४५ हजार हेक्टरवर आहे. सूर्यफूल, जवस करडई, तिळाची पेरणी झाली आहे. रब्बीसाठी प्रशासनाने बियाण्यांची मागणी केली आहे. खतांचाही पुरवठा आहे. मात्र, मागणीच नसल्याचे ते पडून आहे. आज अखेर १५ टक्के एकूण पेरणी झाली असली, तरी गव्हाच्‍या पेरणीमुळे हा आकडा वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : “चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!” पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT