ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : पारनेरची घरकुलांत आघाडी; ८६.६५ टक्के उद्दिष्ट पूर्ती, १३५७ घरकुलांचे काम पूर्ण

सरकारने प्रत्येकाला घर हवे या योजनेअंतर्गत विविध घरकुल योजना आणल्या आहेत.

मार्तंड बुचुडे

पारनेर - तालुक्यात पंतप्रधान, रमाई व शबरी आवास या विविध योजने अंतर्गत २०१७ ते २०२३ अखेर १५६६ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी १३५७ घरकुले पूर्ण झाली आहे. साधारणपणे सुमारे ८६.६५ टक्के घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. घरकुलात पारनेर तालुका आघाडी घेतली आहे.

सरकारने प्रत्येकाला घर हवे या योजनेअंतर्गत विविध घरकुल योजना आणल्या आहेत. त्यात पंतप्रधान आवास, रमाई आवास व शबरी आवास या तीन योजनांमार्फत सरकार गरजूंना घरकुलासाठी अनुदान देत आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर ही योजना प्रभावी राबवून सुमारे १३५७ घरकुलांची बांधकामे पूर्ण करून त्याचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. तालुक्यात उद्दिष्टापेक्षा अधिक कामे करण्यात पूर्ण झाली आहेत.

सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यात २४ हजार ५७० रुपये मजुरी तर १२ हजार रुपये शौचालयासाठी रकमेचा समावेश आहे. त्यासाठी लाभार्थ्याने किमान २७० स्केअरफूट आकाराचे घराचे बांधकाम करणे व त्यात शौचालय बांधणे बंधनकारक आहे. यातील रमाई आवास व शबरी आवास या दोनही योजना राज्य सरकारमार्फत राबविल्या जातात. त्याचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना राज्य सरकार देते. तर पंतप्रधान आवास योजना राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे संयुक्त रितीने राबविण्यात येत आहे. त्याचे अनुदानही राज्य व केंद्र सरकारकडून मिळते.

पारनेर तालुक्याने घरकुलाच्या कामात आघाडी घेतलेली आहे. तालुक्यासाठी १५६६ घरकुले मंजूर होती. त्यापैकी १३५७ घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे.

दयानंद पवार, गटविकास अधिकारी, पारनेर

तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांची घरकुले मंजूर झाली आहेत. त्यांची घरकुले लवकरात लवकर पूर्ण करुन संबंधितांना आर्थिक लाभ मिळावा, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.

जयराम ठुबे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती पारनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT