Rahuri News Esakal
अहिल्यानगर

Rahuri Police Bribe: दुकानदारांना धमकी देऊन मागितला दरमहा २० हजारांचा 'हफ्ता', सहायक पोलिस निरीक्षकास लाच घेताना अटक

दारू दुकानाचा परवाना रद्द करण्याची, तसेच दुकान चालक व ग्राहकांवर कारवाई करण्याची धमकी देऊन, दरमहा वीस हजारांची मागणी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकास पंधरा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Police Inspector Caught for Bribe : शहरातील दारू दुकानाचा परवाना रद्द करण्याची, तसेच दुकान चालक व ग्राहकांवर कारवाई करण्याची धमकी देऊन, दरमहा वीस हजारांची मागणी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकास पंधरा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ज्ञानदेव नारायण गर्जे (वय ५०, रा. तपोवन रोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. गर्जे हे राहुरी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर मंगळवारी (ता.५) रात्री उशिराने राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुरी शहरातील मोटवानी वाईन शॉपच्या व्यवस्थापकांनी याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

गर्जे यांनी वाईन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून लिकर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांवर व तक्रारदारावर कारवाईची व दुकानाचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली होती. कारवाई न करण्यासाठी दरमहा वीस हजारांची मागणी केली होती. काल गर्जे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तक्रारदाराच्या वाईन शॉपमध्ये आले. (Latest Marathi News)

तडजोडीअंती १५ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताना गर्जे यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक नीलिमा डोळस, पोलिस नाईक संदीप हांडगे, पोलिस शिपाई सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT