पोलिसांची ठाण्यातच दिवाळी साजरी sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : पोलिसांची ठाण्यातच दिवाळी साजरी

जनतेची सुरक्षा हाच आमच्यासाठी सण असल्याची भावना

प्रा. सुनील गर्जे

नेवासे : शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच, नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना ‘ऑन ड्यूटी’च हा सण साजरा करावा लागतो, मात्र कुठलीही तक्रार न करता जनतेची सुरक्षा हाच आमचा सण असल्याची भावना ते बोलून दाखवतात.

समाजातील सर्व घटकांतून दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की आप्तांकडे जाण्याची ओढा सर्वांना लागलेली असते. घरात तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा आस्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र सणाचा आनंद घेता येत नाही.

दिवाळी सणामुळे बसस्थानक, बाजारपेठा, मंदिरे आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार, हे लक्षात घेऊन अशा ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतो. ऐन सणासुदीत घातपाती कारवाया होऊ नयेत, यासाठी पोलिसांना डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस बंदोबस्तासाठी थांबावे लागते. पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने कामाचा ताणही मोठा असतो. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास करणे, रात्रीची गस्त, चौकी सांभाळणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात. त्यामुळे त्यांची दिवाळी ठाण्यातच साजरी होते. मात्र, जनतेने सुरक्षित सण साजरा केल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर असते.

महिला पोलिसांची अडचण

दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र, महिला पोलिसांना कामावरून रजा मिळत नसल्याने, वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावा लागतो. शिवाय, दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र, सुटी मिळत नसल्याने तेही शक्य होत नाही. भाऊबीजेलाही भावाला ओवाळता येईल याची शाश्‍वती नसते, अशी भावना महिला पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे, हेच आमचे कर्तव्य आहे. तेच आमचे सण- उत्सव आहेत. कर्तव्य बजावताना त्याग हा करावाच लागतो. त्यातच आम्हाला आनंद असतो. त्यामुळे सणा-सुदीच्या काळातही कर्तव्य पार पाडतो.

- बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: पुढील चार दिवसांत पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिला अंदाज

SSC HSC Supplementary Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी होणार जाहीर

ST Bus: पंढरपूर वारीसाठी एसटीची धाव! राज्यभर ५५०० विशेष बसचे नियोजन; महिलांना ५०% सवलत, तर 'या' प्रवाशांना मोफत प्रवास

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात; पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविली

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

SCROLL FOR NEXT