crime esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News: २८ किलो गांजासह तिघांना अटक

कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख ६० हजार रुपये किमतीचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

मुकेश अरुण नेटके (वय ३४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, जि. पुणे), जावेद इनायत शेख (वय २१, रा. शिवाजीनगर, स्टेशन रोड, जि. पुणे) व अजय अरुण जोजंट (वय २६, रा. शिवाजी नगर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्या पथकातील उपनिरीक्षक सोपान गोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, संदीप घोडके, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, रोहित येमूल आदींनी नगर-मनमाड रोडवर, नगरकडे येणारी एक कार ताब्यात घेतली. पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता डिकीत ताडपत्रीच्या दोन पिशव्यांत गांजा मिळून आला. गांजा आमचा असून, विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली आरोपींनी दिली.

सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी अजय जोजंट हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अहमदनगर व पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया आता होणार अधिक स्मार्ट! गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; मेगा प्लॅन काय?

Manchar News : ‘पाणी नको, सिलिंग हटवा’चा नारा; आंबेगावात शेतकऱ्यांची एकजूट, न्यायालयीन लढ्याचा निर्धार

स्वामी भक्तांना अनोखी भेट; श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त “स्वामी गुरुमाऊली” गाणं प्रदर्शित

YIN Elections : ‘यिन’ निवडणुकीचा जल्लोष! तरुणाईचा उत्साह, गुलालाची उधळण, दुचाकी रॅली; विजयानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT