Ahmednagar Police Action Against Criminals : जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणारा सराईत गुंड लंगड्या ऊर्फ जयसखा अंकुश काळे (वय ५१, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरू असतानाच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी ‘एमपीडीए’चे (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरअस ॲक्टिव्हिटी) हत्यार उपसले आहे.
जिल्ह्यातील पारनेर, नगर तालुका, बेलवंडी, श्रीगोंदा व सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१७ ते २०२३ या कालावधीत घातक हत्यारांसह दरोडा, जबरी चोरी, दुखापत करणे, दरोड्याचा प्रयत्न, मारहाण असे गंभीर गंभीर स्वरूपाचे गुन्हे लंगड्या काळे याच्याविरुद्ध दाखल आहेत, तसेच सर्वसामान्यांवर काळे हा दहशत निर्माण करत होता.
काळे याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या, तरीही गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याने काळेवर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली. सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी एमपीडीएचा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक यांना पाठविला होता. (Latest Marathi News)
पोलीस अधीक्षक ओला यांनी काळे याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा म्हणून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे एमपीडीएचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरत, दत्तात्रय हिंगडे, रवींद्र पांडे, सुरेश माळी, रवींद्र कर्डिले, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, अशोक मरकड यांनी आरोपीला अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले.
सराईत गुन्हेगारांना इशारा
सराईत गुन्हेगार, वाळूतस्कर, संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले असून, येत्या काळात गुन्हेगारांविरुद्ध जास्तीत-जास्त प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिस अधीक्षक ओला यांनी दिले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.