Raksha Dog Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : ‘रक्षा’च्या खांद्यावर नगरची सुरक्षा; दोनशे पेक्षा अधिक गुन्ह्यांची केली उकल

पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच रक्षा, राणा, जंजीर, लुसी आणि सीमा हे पाच श्वानांचे पथक देखील नगरकरांची सुरक्षा करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- अरुण नवथर

अहमदनगर - पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच रक्षा, राणा, जंजीर, लुसी आणि सीमा हे पाच श्वानांचे पथक देखील नगरकरांची सुरक्षा करत आहेत. खून, दरोडा, चोरी, अपहरण अशा शेकडो गुन्ह्यांची उकल या श्वान पथकाने केलेली आहे. एवढेच नव्हे तर व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यांची सुरक्षा देखील याच श्वानांकडे आहे.

नगरच्या पोलिस दलातील आठ वर्षांच्या ‘रक्षा’ने आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल केली आहे. कोपरगाव, शेवगाव येथील दरोडा, रेल्वेस्थानक परिसरातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराचा गुन्हा, यांसारख्या अनेक गुन्ह्यांच्या तपासात रक्षाचे मोलाचे योगदान आहे. तिच्याप्रमाणेच जंजीर आणि लुसी यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे.

राष्ट्रपतींसह अन्य व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यापूर्वी संबंधित ठिकाणाची तपासणी करण्याचे महत्त्वा काम जंजीर आणि लुसी करतात. त्यात एकट्या जंजीर याने आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक ठिकाणांची तपासणी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नुकत्याच शिर्डी येथे आल्या होत्या.

त्यांच्या दौऱ्यापूर्वी जंजीर आणि लुसी यांनी मुर्मू यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसराची तपासणी केली होती. जंजीर हा जेमतेम तीन वर्षांचा असला, तरी त्याची कामगिरी मोठी आहे. त्याला पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी देखील तपासासाठी जावे लागते.

सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडला, तर हे श्वानपथक तातडीने तपासासाठी हजर असते. ए. जे. मुटकुळे, आर. आर. वीरकर, ए. एस. गवळी, एस. सी. गोरे, एम. एस. वैराळ, एस. जी. सगलगिरे, उमेश गोसावी, यू. आर. पवार आदी पोलिस कर्मचारी या श्वान पथकाची देखरेख करतात.

अशी होते देखभाल

श्वान पथकातील रक्षा, जंजीर, लुसी, राणा आणि सीमा यांचे दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास ट्रेनिंग असते. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हे श्वान दररोज नवीन गोष्टी शिकतात. ठराविक दिवसांनी त्यांचे मेडिकल चेकअप केले जाते. तसेच त्यांच्या खाण्याची वेळ देखील निश्चित आहे.

खारे कर्जुने येथे जंजीरची मदत

काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे एका शेतकऱ्याच्या घरामध्ये लष्कराच्या दृष्टीने संवेदनशील असलेला मोठा बॉम्बचा साठा सापडला होता. यावेळी तपासासाठी गेलेल्या पोलिस पथकाने जंजीर याची मदत घेतली होती. नारायणडोह आणि बायपास रस्त्यावर सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात देखील जंजीर आणि लुसी यांची तपासात मोठी मदत झाली होती.

श्वान पथकामुळे अनेक गुन्ह्यांची उकल झालेली आहे. त्यात काही क्लिष्ट आणि गंभीर गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तेथून श्वान पथकाला तपासाची दिशा मिळते. त्याचे विश्‍लेषण करून संबंधित गुन्ह्याचा तपास लागतो.

- ए. जे. मुटकुळे, डॉग युनिट कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

Arjun Sonawane : धनुर्विद्येतील 'अर्जुन' हरपला! राष्ट्रीय पदकविजेता खेळाडू अर्जुन सोनवणेचे अपघाती निधन

Mumbai News: ...तर केवळ पहिलीपासून हिंदीला विरोध! नागरिकांच्या प्रतिसादानंतर समिती अध्यक्षांची माहिती

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT