Shivaji Kardile  Sakal
अहिल्यानगर

Rahuri News:कर्डिले पिता-पुत्राविरुद्ध खासगी फिर्याद रद्द, धमकवण्याचा लावला होता आरोप

माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचा मुलगा अक्षय यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायालयाने खासगी फिर्याद दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश आता रद्द करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ex MLA Shivajirao Kardile:माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचा मुलगा अक्षय यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायालयाने खासगी फिर्याद दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे.

बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील रहिवाशी ॲड. अभिषेक भगत यांनी नवरात्र उत्सवाच्या वेळेस ता. २२ सप्टेंबर २०२२ रोजी धमकावण्यात आले होते. याप्रकरणी त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही. ॲड. भगत हे ता. २३ सप्टेंबर २०२२ रोजी आष्टी-अहमदनगर रेल्वेच्या उद्घाटन समारंभाला आष्टी येथे गेले होते. त्यावेळेसही धमकावण्यात आले होते.

त्यानंतर ता.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करून कर्डिले यांच्या वतीने धमकावले होते. ॲड. भगत यांनी या घटनांच्या आधारे अहमदनगर येथील प्रथम वर्ग न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक ८ यांनी कोतवाली पोलिसांना फौजदारी न्यायप्रक्रिया संहितेच्या १५६ (३) कलमातील तरतुदीअन्वये पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता.

कर्डिले पिता-पुत्रांनी प्रथम वर्ग न्यायालयाच्या आदेशावर जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेऊन प्रथम वर्ग न्यायालयाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली होती. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यार्लगड्डा यांच्यासमोर या पुनर्विलोकन अर्जाची सुनावणी झाली. कर्डिले पिता-पुत्रांच्या वतीने ॲड. भूषण बऱ्हाटे यांनी युक्तिवाद केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT