Ahmednagar News esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News: विद्युतीकरणाने रेल्वेप्रवास सुपरफास्ट

कोपरगाव ते कान्हेगाव इलेक्ट्रिक डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पाअंतर्गत कोपरगाव ते कान्हेगाव या १६ किलोमीटर अंतराची पाचव्या टप्प्याची चाचणी शनिवारी (ता. २८) घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करण्यात आला आहे.

मागील तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. आता कोपरगाव ते कान्हेगाव या १६ किलोमीटर डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली.

आता एकूण ६० किलोमीटर अंतराची चाचणी घेतल्याची माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपककुमार यांनी दिली. मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबापान घ्यावा लागत होता.

तासन् तास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागते. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे. नगर ते मनमाडपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागेल, असा अंदाज आहे.

कोपरगाव ते कान्हेगाव द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेश अरोरा, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार, इजिनिअर सुद्धांसू कुमार, ज्युनियर इंजिनियर प्रगती पटेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर व आदी उपस्थित होते.

ताशी १२५ किलोमीटर वेग

या कामामुळे रेल्वे ताशी १२५ प्रतिकिलोमीटर वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंत काम पूर्ण होणार आहे. शनिवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT