Ahmednagar news
Ahmednagar news esakal
अहमदनगर

Ahmednagar : पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : जिल्ह्यातील पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा गेल्या दहा वर्षांपासून भरण्यात आल्या नव्हत्या. पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला या रिक्त जागांमुळे दैनंदिन कामकाजासाठी माहिती मिळत नव्हती. जे पोलिस पाटील कार्यरत होते, त्यांच्यावर चार-पाच गावांची जबाबदारी होती. अखेर राज्य शासनाने या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ४७६ गावांसाठी गुरुवारी (ता. ७) आरक्षण काढण्यात आले. अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, नेवासे आणि नगर तालुक्यातील गावांचे आरक्षण काढण्यात आले.

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमधील सभागृहात नगर-नेवासे उपविभागाचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणासाठी सभा घेण्यात आली. नगर तहसीलदार संजय शिंदे, नेवासे तहसीलदार संजय बिराजदार, नेवासे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पारेकर, पोलिस अधिकारी उपस्थित होते. नगर-नेवासे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार शिंदे यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रांताधिकारी पाटील यांनी सभागृहातील उपस्थितांना आरक्षण कोणत्या पद्धतीने काढले जाते. आरक्षणाच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. नगर-नेवासे तालुक्यातील १२९ गावांच्या पोलिस पाटील पदासाठी आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित जातीसाठी १६ (महिला ५), अनुसूचित जमाती १५ (महिला ५), विशेष मागास प्रवर्ग ४ (महिला १), भटक्या जमाती (अ) ५ (महिला २), भटक्या जमाती (ब) ५ (महिला २), भटक्या जमाती (क) १ (पाचुंदा, ता. नेवासे), भटक्या जमाती (ड)१ (पांगरमल, ता. नगर), ओबीसी २२ (महिला ७), आर्थिक दुर्बल १३ (महिला ४), खुला गट ४७ (महिला १३).

प्रांताधिकारी गावांचे गाव लिहिलेल्या चिठ्ठ्या सभागृहात दाखवून प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये टाकत होते. सर्व चिठ्ठ्या एकत्र मिसळून ईश्‍वरी श्रीकांत ढवळे या पाच वर्षी मुलीच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली. ईश्‍वरीने चिठ्ठी काढल्यानंतर ती चिठ्ठी सभागृहात दाखविली जात होती. सर्वांनी पाहिल्यानंतर त्या चिठ्ठीच्या मागे आरक्षणाची नोंद केली जात होती.

अनुसूचित जाती (१६) ः नगर- निंबोडी, पिंपळगाव लांडगा, नांदगाव, वाळुंज, पिंपळगाव कौडा, मेहकरी, नेवासे ः चिंचबन, कारेगाव, खुपटी, सुरेगाव-दही. महिला राखीव (५) ः खांडके, खंडाळा, टाकळी काझी, निंबळक, शहापूर -केतकी (सर्व ता.नगर).

अनुसूचित जमाती (१५)ः नगर- शिंगवे नाईक, खारे कर्जुने, नेवासे- बोरगाव, खलालपिंप्री, खेडले काजळी, गोमळवाडी, बेलपांढरी, वाटापूर, दिघी. महिला राखीव (५)- विळद, आठवड, हातवळण (ता. नगर), पाचेगाव, खेडले परमानंद (ता.नगर).

विशेष मागास प्रवर्ग (४) ः घोगरगाव, रांजणगाव देवी, हंडीनिमगाव (ता. नेवासे), महिला सारोळा बद्धी (ता. नगर).

विमुक्त जाती (अ) जागा ५ ः माथणी, कोल्हेवाडी, सारोळा कासार (ता.नगर), महिला (२) भेंडा खुर्द (नेवासे), गुणवडी (ता.नगर).

विमुक्त जाती (ब) जागा ५ ः म्हसले, रामडोह, भेंडा बुद्रुक, टोका, मुरमे (ता. नेवासे), महिला (२) ः म्हसले, रामडोह (ता. नेवासे).

विमुक्त जाती (क) जागा १ ः पाचुंदा (ता. नेवासे).

विमुक्त जाती (ड) जागा १ ः पांगरमल (ता. नगर).

इतर मागास प्रवर्ग २२ जागा ः नगर- बारदरी, नागरदेवळे, रतडगाव, अकोलनेर, नवनागापूर, सोनेवाडी (चास), बाबुर्डी घुमट, पिंपळगाव माळवी, दहिगाव, निमगाव वाघा, कापूरवाडी, वाटेफळ, मांजरसुंबा. नेवासे-बेल्हेकरवाडी, गोपाळपूर. महिला ः बहिरवाडी, सांडवे, भोरवाडी, कामरगाव, (ता. नगर). नजीक चिंचोली, शिंगवे तुकाई, गोंडेगाव (ता. नेवासे).

आर्थिक मागास प्रवर्ग १३ ः झापवाडी, निपाणी निमगाव (ता. नेवासे). वडगाव तांदळी, खडकी, हिवरे झरे, मांडवे, भोयरे खुर्द, मदडगाव, हिवरे बाजार (ता. नगर). महिला ४ ः भोयरे पठार (ता. नगर). सुलतानपूर, पानसवाडी, म्हाळस पिंपळगाव (ता. नेवासे).

खुला महिला १३ ः मठपिंपरी, उदरमल, पोखर्डी, तांदळी वडगाव, इसळक, जखणगाव, पिंपळगाव वाघा, हमीदपूर, खातगाव टाकळी, गुंडेगाव,

पाथरवाला, अंतरवाली, नारायणवाडी (ता. नेवासे) उर्वरित ३४ गावांमध्ये पोलिस पाटीलपद हे खुले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT