मंत्री राधाकृष्ण विखे  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : पुण्याचे काम करायला भाग्य लागते ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे

तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : पुण्याचे काम करायला भाग्य लागते, ते तुमच्या नशिबी आले नाही यात आमचा काय दोषॽ पुण्याचे काम आमच्या हातूनच व्हायचे होते, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख न करता लगावला.

निळवंडे धरणाच्या मुखापासून कालव्यांची पाहाणी करताना संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ते गुंजाळवाडी पर्यंत सुरू असलेल्या कालव्याच्या कामाचा आढावा घेत त्यांनी या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले.

विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा आता संपत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून पाण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवार (ता. ३१) रोजी होत असल्याची बाब सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने निळवंडे प्रश्नावरून कोण काय म्हणतो याकडे लक्ष देत नाही. या प्रकल्पावरून झालेले रणकंदन अनेक वर्षे सर्वांनी अनुभवले याकडे लक्ष वेधत, राज्यात ज्या पक्षाचे सरकार होते त्यांनी या प्रकल्पासाठी निर्णय केले. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागला आहे. आरोप होत राहतात.

कालपर्यंत वाळू अभावी कालव्यांची काम ठप्प असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांना कालव्यातून पाणी सोडावे म्हणून मागणी करण्याची उपरती झाली. पण कालव्यांच्या कामाची सुरूवात धरणाच्या मुखापासून युती सरकारच्या काळात सुरू झाली आणि युती सरकारच आता पाणी देणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.

याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, भीमराज चत्‍तर, रविंद्र थोरात जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, प्रांताधिकारी हिंगे, जलसपंदा विभागाचे अरूण नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT