ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : पैठणमधील रस्त्याने डावलले; फाउंडेशनने स्वीकारले,महाकाय वटवृक्षाचे रोपण

आज सरकार ‘झाडे लावा झाडे जगवा’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली २५ ते ३० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड घातली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

बोधेगाव - पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवडीचा चंग बांधलेल्या संजय आंधळे यांनी झाड फाउंडेशनच्या माध्यमातून चालू वर्षी गोळेगाव (ता. शेवगाव) येथे महाकाय वटवृक्षाचे रोपण केले आहे.तालुक्यातील जनतेला वृक्षांचे महत्त्व, त्यांची जीवनात असलेली किंमत कळावी आणि प्रत्येकाच्या मनात वृक्ष लावण्याचा विचार निर्माण व्हावा,

वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ बनावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संजय आंधळे यांनी झाड फाउंडेशनच्या माध्यमातून २०२१ मध्ये तीन हजार, तर २०२२ मध्ये चार हजार आणि २०२३ मध्ये पाच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. चालू वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने आतापर्यंत तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या वृक्षांचा शोध घेण्यासाठी आंधळे संभाजीनगरला जात होते. त्यांना पैठण तालुक्यातील कातपूर फाट्यानजीक २५ ते ३० वर्षांपूर्वीचे ३० फूट उंच आणि १८ फूट गोलाई असलेला वटवृक्ष रस्त्याच्या कामात येत होता. त्यामुळे त्याला काढण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले. त्याच क्षणी त्यांनी अभियंता, कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क केला. कंटेनर घेऊन जाऊन आंधळे यांनी हा वृक्ष मुळासकट आणून गोळेगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील (कै.) लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारकासमोर त्याचे प्रत्यारोपण केले.

आज सरकार ‘झाडे लावा झाडे जगवा’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली २५ ते ३० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड घातली जात आहे. पर्यावरणाला प्राधान्य देत विकास साधला तरच मनुष्यप्राणी मुक्त श्वास घेणार आहे.

संजय आंधळे, अध्यक्ष, झाड फाउंडेशन, गोळेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT