Ahmednagar
Ahmednagar  sakal
अहमदनगर

Ahmednagar : भिंगारला रंगणार शाहिरांची जुगलबंदी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : वेदांपासून भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरीपर्यंत धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून ते तत्त्वज्ञान आपल्या कवनांतून मांडणाऱ्या आध्यात्मिक शाहिरांचीही महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. या आध्यात्मिक शाहिरांचा मेळा मागील दीडशे वर्षांपासून नवरात्रात भिंगारमधील सरपण गल्लीत भरत आहे. कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर पुन्हा शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे शाहीर हजेरी लावणार आहेत.

भारतीय तत्त्वज्ञानात आस्तिक व नास्तिक असे दोन मतप्रवाह दिसून येतात. तसेच सृष्टीची निर्मिती कशी झाली, याबाबतही अनेक तत्त्वज्ञांनी आपले विचार मांडले. यात कपिलमुनींनी सांख्य तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्यावरून सृष्टीनिर्मितीचा कारक शिव की शक्ती, असा तात्त्विक वाद घेऊन मराठीतील आध्यात्मिक शाहिरांतही दोन गट दिसून येतात.

कलगी व तुरा अशा दोन शाहिरांच्या गटांत

आध्यात्मिक विषयावर सवाल-जवाब होतात. या शाहिरांची कवने सांख्य तत्त्वज्ञान, वेद, उपनिषदे, सुक्ते, भगवद्‍गीतेसह पौराणिक ग्रंथांवर आधारलेली असतात. डफ, ढोलकी, तुणतुण्याच्या गजरात आध्यात्मिक वाद-विवाद रंगतो. राज्यातील २३ ठिकाणी असे शाहिरी कार्यक्रम होतात. मात्र, भिंगारमधील कार्यक्रम हा सर्वांत जुन्या कार्यक्रमांपैकी एक समजला जातो. यात कलगीवाले शाहीर प्रकृतीला, तर तुरेवाले शाहीर पुरुषाला सृष्टीनिर्मितीचे कारक मानतात. हे शाहीर गुरू-शिष्य परंपरेतून तयार होतात.

शाहीर त्यांच्या गुरूकडून आलेल्या कवनांच्या बाडातून कवने निवडतात. आपलीच बाजू कशी योग्य, यासाठी युक्तिवाद करतात. हा कवनांचा ठेवा अप्रकाशित आहे. या शाहिरी परंपरेत येण्यास तरुण पिढी तयार नाही. ही परंपरा टिकून राहावी, आध्यात्मिक शाहिरी जगाला कळावी, यासाठी भिंगार कलगी-तुरा मंडळ मागील दीडशे वर्षांपासून प्रयत्न करत आहे. दर वर्षी नवरात्रात तिसऱ्या माळेला भिंगारच्या सरपण गल्लीत हा कार्यक्रम होतो. कोविडमुळे मागील दोन वर्षे हे कार्यक्रम झाले नाहीत. मात्र, यंदा हा कार्यक्रम बुधवारी भिंगारच्या सरपण गल्लीत रात्री आठ वाजता होणार आहे. कोरोनाच्या लाटेनंतर पुन्हा आध्यात्मिक शाहिरी कवने सादर होणार आहेत. पुन्हा सरपण गल्ली रसिक श्रोत्यांनी भरणार आहे.

वैशिष्ट्ये

दीडशे वर्षांची परंपरा

वेद ते ज्ञानेश्‍वरीपर्यंत अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा आधार घेत रंगणार कवने

राज्यभरातील सुमारे १०० शाहीर होणार सहभागी

आध्यात्मिक शाहिरीचा जिल्ह्यातील सर्वांत मोठा कार्यक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT