Criminal sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : सराईत तीन गुन्हेगार राहुरीमध्ये जेरबंद

दोन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : विशेष गुन्हे अन्वेषण पथकाला (एसआयटी) हवा असलेला, सूफी धर्मगुरूच्या हत्याकांडातील एक आरोपी व अन्य तीन सराईत गुन्हेगारांना पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने सापळा लावून जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय २७, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय २६, रा. चवडी जळगाव, ता. मालेगाव), विशाल सदानंद पिंगळे (वय २३, रा. कोपरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

काल (बुधवारी) रात्री नऊ वाजता नगर-मनमाड महामार्गावरील एका हॉटेलमध्ये गावठी पिस्तूल बाळगणारे गुन्हेगार बसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना कळविले. राहुरी शहरात दीड कोटीच्या प्रतिबंधित औषधांच्या अवैध साठ्याच्या जप्तीच्या कारवाईसाठी आलेले पोलिस उपअधीक्षक संदीपपान मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ हॉटेल परिसरात सापळा लावला. रात्री दहा वाजता आरोपी जेवायला बसले असताना पोलिस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. आरोपींच्या अंगझडतीत दोन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे सापडली. कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केल्यानंतर हॉटेलमधील ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT