अजय वसंतराव कापरे sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : शेवगावच्या लेकराचा अमेरिकेत डंका ! मेहनतीने मिळवलं कंपनीचं अध्यक्षपद

अजय कापरे हे मुळचे सामनगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी व अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त असलेल्या ॲड. वसंतराव शाहुराव कापरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत.

राजू घुगरे

अमरापूर - मुळचा सामनगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी असलेल्या अजय वसंतराव कापरे या युवकाने अमेरीकेतील आरोग्य, देखभाल, तंत्रज्ञान व उपाययोजना या क्षेत्रात काम करणाऱ्या एँलिके या कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचा अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे.

प्रचंड मेहनत, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामिण भागातील तरुणाने अल्पावधीत थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीच्या व्यवस्थापनाचे प्रमुखपद मिळवल्याने गावाची, तालुक्याची व जिल्ह्याची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.

अजय कापरे हे मुळचे सामनगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी व अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त असलेल्या ॲड. वसंतराव शाहुराव कापरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. तर युवा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय कापरे यांचे ते बंधू आहेत. संगणक अभियांत्रिकीत पदवीधर असलेल्या कापरे यांनी टेक्सास टेक विद्यापीठातून एम. बी. ए. मार्केटींगची पदवी घेतली.

अमेरीकेतील एल्मवुड पार्क, न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेल्या व ७५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा पसारा असलेल्या रुग्णालय, आरोग्य प्रणाली, निदान प्रयोगशाळा, आरोग्यसेवा यामध्ये २००२ या वर्षापासून एँलिके या कपंनीत काम करत आहेत. त्यामध्ये धोरण व विपणन अधिकारी या पदावर कापरे हे सहा वर्षापासून काम करत आहेत.

संस्थेच्या कामकाजाची प्रक्रिया व प्रणाली सुधारण्यासाठी तसेच हेल्थ केअर टेक्नालॉजी सोलुशन विकसीत करण्यासाठी वितरण संस्थांना समर्थन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्या दृष्टीने संस्थेच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्यावर अधिक जबाबदारीचा भार म्हणून थेट एँलिके या कंपनीचे अध्यक्ष व मुख्य धोरण अधिकारी म्हणून नियुक्ती देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सामनगाव सारख्या दुष्काळी व ग्रामिण भागातील तरुणाने उच्च शिक्षण व स्वत:च्या कर्तृत्वशैलीवर थेट अमेरिकेतील संस्थेचे अध्यक्षपद मिळवल्याने ग्रामिण भागातील तरुणांसाठी तो मोठा दिपस्तंभ ठरला आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : मुलुंड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

Pune Kolhapur Highway accident : पुणे -कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT