Ghanshyam Shelar sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : श्रीगोंद्याचा 'विकास' हेच ध्येय

घनश्‍याम शेलार; पदाला महत्त्व न देता कामे सुरूच ठेवणार, पाण्यासाठी संघर्षाची तयारी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : मतदारसंघातील पाणी, वीज, रस्ते यासोबतच सामान्यांच्या वैयक्तिक प्रश्नांत लक्ष घालून ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. पद, सत्ता अथवा संस्थाही ताब्यात नाही. मात्र, लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्याची उतराई होणार नाहीच. मात्र, आपण सदैव मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवून कामास प्राधान्य देत राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी दिली.

शेलार यांचा वाढदिवसा निमित्त ''सकाळ''शी बोलताना ते म्हणाले, गेली चाळीस वर्षे झाली, श्रीगोंद्याच्या विकासासाठी झटतोय. ग्रामीण युवक संघटनेच्या माध्यमातून सुरु केलेली चळवळ आज प्रत्येकाच्या घरापर्यंत गेली याचा आनंद आहे. आपल्या नावापेक्षा लोकांच्या तोंडी आपले काम आहे, यापेक्षा जास्त कसली अपेक्षा असायला हवी. कुकडीचे पाणी तालुक्यात आणण्यात आपला वाटा आहे. त्यासाठी झालेल्या संघर्षाचा साक्षीदार कुकडीखालील लाभधारक आहे. सध्या तालुक्यातील विजेचे प्रश्न उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून सोडवित आहे.

तालुक्यातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे जागीच असल्याचे सांगत शेलार म्हणाले, आपला राजकीय जन्मच मुळात या संघर्षासाठी झाला की काय अशी शंका येते. घोडच्या पाण्याने तो भाग बागायती झाला. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या भागातील शेती जळते. आवर्तन सुटते. परंतु त्या भागातील शेतकरी गेल्या काही वर्षांत अडचणीत आहे. धरणाची क्षमता वाढविण्याच्या केवळ घोषणा झाल्या, प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. त्या भागात ठिबक सिंचन वाढविण्यासाठी दीर्घकालीन योजना हाती घ्यावी लागणार आहे.

इकडे कुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष सुरुच आहे. आपण त्यासाठी लढतोय. मात्र, केवळ सल्लागार समितीचा सल्लागार असणे आणि आमदार असणे यात मोठा फरक पडत असल्याने मर्यादा येतात. पाण्यासाठी आपण कधीही पक्ष, सत्ता याचा विचार केला नाही. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सर्वात पुढे राहिलो व यापुढेही राहिन असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

आमदारकी मिळाली तर विकास पर्व

शेलार म्हणाले, गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला. पण त्यानंतर घरी बसलो नाही तर लोकांच्यात सर्वात पुढे आहे. राजकारण करताना पद हवे असते मात्र आपण ते नाही म्हणून थांबलो नाही. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती व कुटुंबाच्या सुख-दु:खात जातो. आमदारकी असल्यावर काय फरक असतो तो लोकांना दाखविण्याची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी एका संधीची गरज आहे. नेते व मतदारांनी कामाच्या जीवावर ती द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT