Ahmednagar Shrigonda Hingani Dumal Bhairavnath Yatra festival sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : 'बैलजोड्या' सजवून बगाडाला खांदा

हिंगणी दुमालात भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा

देवदैठण : श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील ग्रामदैवत खंडोबा देवाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. दोन वर्ष यात्रेवर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे यावर्षी यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असते ते मानाचे बगाड. सावंतवाडी येथील वाखारे परिवाराचा मानाचे बगाड हा यात्रेचे मुख्य आकर्षण असते.

बगाड पाहण्यासाठी परिसरातील अनेक भाविक गर्दी करतात. गावातील प्रत्येक कुटुंबातील बैल जोड्या सजवून मानाच्या बगाडाला खांदा देतात. विशेष आकर्षण असते खंडोबा देवाची घाट कडानीचे, कडानीची पावतीची बोली लागते. जो जास्त रक्कम देईल त्याच बैलजोडीला कडणीचा व देवाला प्रदक्षिणा घालण्याचा मान असतो. भानुदास वाखारे, रायचंद वाखारे यांची बैल जोडी कडानीसाठी पात्र ठरली. तर देवाची काठीचा मान पिंपरकर, शितकल, टिळेकर, चव्हाण कर्तरवाडीकडे असतो.

या बागडाची परंपरा साडेतीनशे वर्षापासून सुरू असल्याचे बोलले जाते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात पालखी मिरवणूक, अभिषेक, मांचे बागड, मनोरंजनासाठी लोकनाट्य, सकाळी हजेरीचा कार्यक्रम होतो. यात्रेची सांगता कुस्त्यांच्या अखड्याने होते. जंगी कुस्त्यांचा आखाड्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली. पन्नस रुपयांपासून ते अकरा हजारांपर्यंत निकाली कुस्त्या झाल्या.

पंच म्हणून जुने पैलवान मल्हारी वाखारे, रामदास वाखारे, पै. सोमनाथ वाखारे, पै. योगेश वाखारे यांनी काम पाहिले. रावसाहेब चक्रे यांच्या निवेदनाने आखाड्यात रंगत आली. कुकडीचे संचालक निवृत्ती वाखारे, सरपंच गणेश भोसले, उपसरपंच दीपक सरोदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT