आमदार संग्राम जगताप sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : साइड गटारांचे काम तातडीने करा

आमदार संग्राम जगताप यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

राजेश नागरे

अहमदनगर : सक्कर चौक, अक्षता गार्डन, कोठी चौक व सीएसआरडी कॉलेज या रस्त्यांदरम्यान पावसाळ्यामध्ये तीन ते चार फुटांपर्यंत रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. तात्पुरत्या स्वरूपात या चार ते पाच ठिकाणचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावरील साइड गटार दुरुस्तीबाबत आमदार जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पाहणी करून महापालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त शंकर गोरे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दिवाण, स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता सुरेश इथापे, उद्योजक अफजल शेख, जलअभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, की हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिका व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने प्लॅन तयार करावा, जेणे करून पुढील पावसाळ्यात हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. आता तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना करून तातडीने काम सुरू करावे, नगरोत्थान योजनेतील बालिकाश्रम रोड, मुकुंदनगर, सक्कर चौक ते कोठी रस्ता, महात्मा फुले चौक परिसरातील रस्ता या सर्व रस्त्यावरील साइड गटारी स्वच्छ करण्याचे काम तातडीने सुरू करा. एका बाजूने टँकरद्वारे पाणी टाकावे, ते पाणी दुसऱ्या बाजूला निघाल्यानंतरच ठेकेदाराचे बिल द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT