Sujay Vikhe Patil Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : खासदार विखे यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा राडा

खासदार विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत. विकासाचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा कार्यकर्त्यांना संधी मिळते

संजय आ. काटे

श्रीगोंदे- भाजपाचे खासदार डाॅ. सुजय विखेपाटील यांनी आज लोणीव्यंकनाथ ता. श्रीगोंदे येथील नगर-दौंड महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रांरभ केला. मात्र त्यावेळी झालेल्या छोट्याशा सभेत विखे समर्थक अॅड. बाळासाहेब काकडे व राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब नाहाटा यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जावून शिवीगाळ सुरु झाल्यावर विखे यांच्यासह इतरांनी हा वाद मिटवला. त्यानंतर विखे यांनी 'सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद निवडणूका होवू द्या सगळे ठिक होईल' असे सूचक वक्तव्य केले.

नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले मात्र लोणीव्यंकनाथ येथील रेल्वे गेट परिसरातील तीन किलोमीटर अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी खासदार विखे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. त्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी विखे येथे आले होते. आमदार बबनराव पाचपुते, गणपतराव काकडे, भगवानराव पाचपुते आदी उपस्थितीत होते.

त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते व राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विखे यांचे कौतुक करीत हे काम मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर अॅड. काकडे यांनी त्यांच्या भाषणात रात्री एक व दिवसा एक करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले.

त्यानंतर पुन्हा नाहाटा यांनी माईक हातात घेतला आणि काकडे यांच्यावर शाब्दिक वार सुरु केले. त्याचवेळी काकडे उठून उभे राहिले आणि दोन्ही नेत्यांमध्ये तुफान शिवीगाळ सुरु झाली. खासदार विखे यांच्यासह अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. हा वाद बराच वेळ सुरु होता.

यानंतर खासदार विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत. विकासाचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा कार्यकर्त्यांना संधी मिळते. यापुर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर सगळे म्यूट म्हणजे मूक दिसले असते थोड्या दिवस थांबा श्रीगोंद्यातही तेच दिसणार आहे असे सूचक वक्तव्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT