शाळा.
शाळा.  sakal
अहमदनगर

Ahmednagar : विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकही अचंबित; आदिवासी पाड्यावरील प्राथमिक शाळा अधोरेखित

सकाळ वृत्तसेवा

आनंद गायकवाड

संगमनेर - गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तिच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या नकाशावर अधोरेखित होत आहे. शिक्षणाच्या अखंड ध्यासाने झपाटलेले शिक्षक व विद्यार्थी प्रत्यक्ष पाहण्यासाठी संगमनेरातील जयहिंद लोकचळवळीच्या शिक्षण उपक्रमांतर्गत ३० शिक्षकांनी या शाळेला भेट देवून तेथील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.

शाळेच्या अवघ्या दोन खोल्या शैक्षणिक साहित्याने भरुन गेल्या आहेत. कोविड काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलला रेंज असलेल्या उंचवट्यावर बांधलेली शेड हीच आत्ता शाळा बनली आहे. पहिली ते पाचवीचे कागदोपत्री २७ विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेतून शिकून पुढे शिक्षण घेणारे विद्यार्थी केशव गावीत यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन इतरांचा अभ्यास घेताना, त्यांना सांभाळण्यासाठी सक्रीय योगदान देतात. वर्षभरात घरगुती कार्यक्रमांसाठी सुध्दा एकही सुट्टी न घेता सकाळी नऊ ते रात्री नऊ या काळात शिक्षण प्रक्रिया अखंड सुरु असते.

याच परिसरातील केशव गावीत यांनी २००९ साली नोकरीची सुरुवात या शाळेपासून केली. या भागातील बहुतांश पालक वर्षातील १० महिने रोजगारासाठी स्थलांतर करताना त्यांच्यासोबत मुलेही जात. गावीत यांनी त्या मुलांना गावातच थांबवून शिक्षणाची गोडी लावली. तसेच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय गीव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या मदतीने केल्याने पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले.

स्पर्धा परीक्षा देताना आलेल्या अपयशामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना बालपणापासून यासाठी सक्षम बनविण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या गावीत यांनी त्यांच्यातील क्षमतांचा विकास करण्यासाठी अनेकविविध उपक्रम राबविले. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी विविध विषयांचा अभ्यास लिहू शकतात. १११५ पर्यंत पाढे व भारतीय राज्यघटनेची कलमेही त्यांना तोंडपाठ आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून स्मार्टबोर्डचा उपयोग करीत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवताना त्यांच्यातील सामान्य ज्ञानात वाढ झाली असून, अनेक विद्यार्थ्यांच्या सनदी अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ते खतपाणी घालीत आहेत.

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींची माहिती असल्याने, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातूनच त्यांच्या आयुष्यात बदल होणार असून, त्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे.

- केशव गावीत, शिक्षक

गावीत यांची साडेतीन वर्ष वयाची मुलगी गणिते सोडवते. इंग्रजी मराठी लेखन वाचन करते, सामान्य ज्ञानाचे साडेपाचशे प्रश्न, राज्यघटनेची ४४ कलमे, ११० देशांच्या राजधान्या व २८ पर्यंत पाढे तसेच दोन्ही हातांनी एकाच वेळी दोन भाषेत लिखाणही करते.

- सोमनाथ मदने, शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT