ahmednagar
ahmednagar sakal
अहमदनगर

अहमदनगर : टाकळी ढोकेश्वर घाट ठरतोय मृत्यूचा सापळा

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार- ते टाकळी ढोकेश्वर रस्त्यावरील घाटातील वळण व तीव्र उतारामुळे अनेक अपघात सातत्याने होत आहेत. चालकांसह प्रवासी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. येथील अवघड वळण व तीव्र उतार काढावेत, अशी मागणी नेहमीच प्रवाशांमधून होत आहे.

टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या, काकणेवाडी, पोखरीसह परीसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. येथील घाटात तीव्र उतार व अत्यंत अवघड अशी वळणे आहेत. तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचा वेग जोराचा असतो. मात्र, पुढे आल्यानंतर अवघड वळण असल्याने वाहनांचे ब्रेक उशिरा लागतात. त्यामुळे अवघड वळणावर ही वाहने थेट घाटाखाली जातात.

तेथील संरक्षण कठडेही तुटल्याने वाहनांना अटकाव होत नाही. चालकांसह प्रवासी जखमी होऊन वाहन व वाहनांमधील मालाचे अतोनात नुकसान होते. या घाटात वारंवार अपघात होत असताना ही प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. घाटातील अवघड वळण आणखी किती बळी घेणार आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

ठोस उपाययोजने अभावी अपघात वाढल्याने वाहन धारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. येथील तीव्र उतार कमी करून अवघड वळणे काढावीत, अशी मागणी बांधकाम विभागाकडे विद्युत समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य प्रसाद नवले, सूरज नवले, प्रवासी भगवान वाळुंज, योगेश वाळूंज, रंगनाथ वाळूंज, अनिल वाळूंज, अशोक वाळुंज, प्रवीण वाळूंज, विठ्ठल वाळूंज, विजय वाळूंज, सचिन वाळूंज, गुलाब वाळूंज यांनी केली आहे.

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार रस्त्यावरील तीव्र उतार व अवघड वळणामुळे अनेक अपघात होतात. हा रस्ता दुरुस्त करून अवघड वळण काढण्याच्या सूचना बांधकाम विभागास देण्यात येतील. त्यासाठी घाटातील पर्यायी मार्ग पाहण्यात यावेत.

- नीलेश लंके, आमदार

या घाटातील तीव्र उतार अवघड वळणाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर हे अवघड वळण काढून पर्यायी मार्गाचे काम करण्यात येईल.

- पी. एस. तिपोले, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग पारनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT