Sugar Factory Worker sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनासाठी एल्गार

कारखान्याच्या कामगारांचा निर्णय; जनआंदोलन करणार

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आज (ता.८) थकीत वेतनासाठी एल्गार पुकारण्याचा एकमुखी निर्णय घेतला. कारखान्याचे कुलदैवत लक्ष्मीनारायण मंदिरात शपथ घेतली. कारखाना व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर न्यायालयीन लढाई व उपोषण-जनआंदोलन मार्गाने रस्त्यावर संघर्ष केला जाईल, असा इशारा कामगारांनी दिला.

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने यंदाच्या वर्षी कारखाना सुरू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने, कर्जदार जिल्हा बँकेतर्फे कारखान्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून, मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे, कामगारांची रोजीरोटी बंद झाली. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अाधिपत्याखाली सहा वर्षापासून संचालक मंडळ कार्यरत आहे.

कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे यांच्या अध्यक्षतेखाली आज कामगारांच्या चिंतन बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. कामगार नेते इंद्रभान पेरणे, अर्जुन दुशिंग, सचिन काळे, सुरेश थोरात, चंद्रकांत कराळे, सिताराम नालकर यांनी कारखान्याचे कायम, निवृत्त, मजुरी हजेरी व संकलित वेतनावरील कामगारांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. जिल्हा बँकेने १११ कोटींच्या कर्जासाठी कारखाना ‘सील’ केला.

कामगारांचे १२८ कोटी बिगरव्याजी आहेत. खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे यांच्या समवेत बैठकीत मागील सहा वर्षाच्या काळातील कामगारांच्या वेतनाची थकीत देणी अदा करण्याचा शब्द देण्यात आला. परंतु, आता लेखी आश्वासनात पैसे उपलब्ध होतील, तसे टप्प्याटप्प्याने देऊ, असे कळवून व्यवस्थापनाने तोंडाला पाने पुसली. ऊस असताना कारखाना बंद ठेवून, कामगारांना वाऱ्यावर सोडले, असे आरोप कामगार नेत्यांनी केले.

सहा वर्षांचा कारभार चव्हाट्यावर आणू

कारखान्याच्या संचालक मंडळाला युनियनतर्फे मागण्यांचे पत्र देऊन, येत्या दहा-बारा दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, जनआंदोलन छेडले जाईल. उपोषणाच्या मंडपात मागील सहा वर्षांचा कारभार चव्हाट्यावर आणू, असा इशारा कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी दिला. महिला कामगारांनीही संघर्षात उतरण्याची शपथ घेतली.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT