elections of teachers banks  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शिक्षक बँकेचे रणांगण तापणार

२१ जागांसाठी ८६२ अर्ज आज छाननी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात वातावरण तापू लागले आहे. २१ जागांसाठी तब्बल ८६२ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (ता. २४) अर्जांची छाननी आहे. ११ जुलैला माघार घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षक बँकेचे रणांगण आता तापणार आहे.

राज्यात सध्या सत्तेचा खेळ सुरू आहे. अशातच शिक्षकांमध्ये जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी खेचाखेची सुरू होत आहे. अनेकांनी अर्ज भरले. ते मागे घेण्यासाठी पॅनलमधील उमेदवारांच्या चकरा संबंधितांच्या घरी सुरू होणार आहेत. त्यामुळे गुरुजी सध्या याच कामांत गुंतले आहेत. दरम्यान, सध्या शाळा सुरू आहेत. असे असताना किती नेते किंवा उमेदवार अधिकृत सुटी घेऊन निवडणुकीच्या कामात गुंततात, की सह्या करून प्रचारात रमतात, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

दरम्यान, बँकेच्या या निवडणुकीसाठी प्रमुख तीन मंडळे पॅनल बनवीत आहेत. याव्यतिरिक्त अनेक मंडळांनी सवता सुभा केला आहे. ऐन वेळी कोण कोणाला पाठिंबा देतात, याबाबत खलबते सुरू आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांच्या चुका दाखविण्याचा सपाटा लावला जात आहे.

अशा आहेत जागा

१६ सर्वसाधारण जागा

१ अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधी

२ महिला प्रतिनिधी

१ इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

१ भटक्या-विमुक्त जाती-जमातींचा प्रतिनिधी

२१ एकूण जागा

निवडणूक कार्यक्रम

२४ जून - अर्जांची छाननी

२७ जून ते ११ जुलै - माघार घेणे

१२ जुलै - चिन्हवाटप

२४ जुलै - मतदान

२५ जुलै - मतमोजणी

एकूण आलेले अर्ज

- सर्वसाधारण - संगमनेर ४६, नगर ४१, पारनेर ४२, कोपरगाव २५, राहाता २८, श्रीरामपूर ३७, जामखेड ४०, पाथर्डी ४३, राहुरी २६, शेवगाव २५, श्रीगोंदे ४१, अकोले २७, नेवासे ४१, कर्जत ३१, नगरपालिका, कँटोन्मेंट ३६, अनुसूचित जाती-जमाती ६५, महिला राखीव १०३, इतर मागास प्रवर्ग ९०, विमुक्त जाती, भटक्या जमाती. विशेष मागास प्रवर्ग ६५, एकूण ८६२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT