Ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : भरती प्रक्रिया पारदर्शक असेल

प्राजक्त तनपुरे; विद्युत सहायक भरतीप्रकरणी प्रतिनिधींशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : विद्युत सहायक भरती प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. भरतीत पारदर्शक पद्धतीने करण्याची दक्षता घेतली आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

तनपुरे म्हणाले, ‘‘तीन दिवसांपूर्वी विद्युत सहायक पदाची यादी जाहीर झाली. त्यात उमेदवारांचा यादीतील काही मुद्द्यांवर आक्षेप होता. काही बाबतीत संभ्रमाचे वातावरण होते. त्यासाठी मुंबई येथे उमेदवारांच्या काही प्रतिनिधींबरोबर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर झाली, म्हणजे अंतिम नियुक्ती दिली असे नाही.’’

‘‘जाहिरात देताना ज्या गोष्टींचे निकष लावले आहेत, त्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन केले जाईल. मग ते बेस्ट ऑफ फाईव्ह असो, शैक्षणिक पात्रतेचे निकष असो किंवा अन्य काही निकष. नियुक्ती देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. कागदपत्रे पडताळणी करताना जाहिरातीतील निकषांची पूर्तता न करणारे अर्ज प्रक्रियेतून बाद केले जातील. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. त्यावर शंका घेऊ नये. पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.’’

शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी

मुंबई येथे विद्युत सहायक भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चेत तुमचा हा भाऊ शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहील, अशी मंत्री तनपुरे यांनी ग्वाही दिली. त्यामुळे, प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. मंत्री तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला विद्युत सहायक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT