child marriage sakal media
अहिल्यानगर

लग्न केले अन् जेलमध्ये गेले

बालविवाह करणाऱ्या तिघांसह ३३ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन तीन मुलींचे विवाह लावण्याचा धक्कादायक प्रकार नगर येथील चाइल्डलाइन संस्थेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. याप्रकरणी आज (मंगळवारी) एकूण ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, फिर्यादी भगवान भिवसेन खेडकर यांना रविवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास अल्पवयीन तीन मुलींचे विवाह लावले जात असल्याची माहिती चाइल्डलाइन संस्थेने दिली. त्यानंतर खेडकर गावात गेले असता, एक मंदिरासमोर, गावाबाहेरील वस्तीवर दुसरा, तर गावातीलच एका घरासमोर तिसरा विवाह झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी वधूंच्या वयासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी गावातील शाळेत जाऊन केली असता, दोन मुली अल्पवयीन असल्याचे आढळून आले. तिसरी मुलगी बीड जिल्ह्यातील असून, खेडकर यांनी तिच्या गावात जाऊन शाळेतील दाखल्याची तपासणी केली. तीही अल्पवयीन असल्याचे समोर आले.

आज (मंगळवारी) खेडकर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही नवरदेव, मुला-मुलींचे आई-वडील, लग्न लावून देणारे नातेवाईक व पुरोहित, मंडपवाला, अशा ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल एस. बी. बटुळे तपास करीत असून, या घटनेतील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.

वरातीदरम्यान झाला होता वाद

गावातील मंदिरासमोरील विवाहसोहळ्यात मंगलाष्टके सुरू असताना एका नवरदेवाची वरात वाजतगाजत आली. यावेळी मंगलाष्टक थांबविण्यावरून दोन्ही विवाहसोहळ्यांतील वऱ्हाडींत वाद झाला होता. एक लग्न ज्या पुरोहिताने लावले, तो त्याचा पहिलाच विवाहसोहळा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT