वृक्षतोड sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : वृक्षतोड पडली महागात

कत्तल करणाऱ्यांसह चोरून नेणाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेवरील १२६ झाडे तोडून ती चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे व इतर व्यक्ती (सर्व रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींच्या विरोधात वाढीव कलमे लावण्यासाठी मनपाच्या पॅनलवरील वकिलांच्या सल्ल्याने पुरवणी फिर्याद द्यावी, अशा सूचना स्थायी समितीने दिल्या आहेत.

महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथील सातशे एकर जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार आठ दिवसांपूर्वी समोर आला होता. आयुक्त शंकर गोरे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेचे उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांनी उद्यान कर्मचारी विजय कुलाळ, गणेश दाणी, तसेच वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य सुरेश खामकर व तुळशिराम पालिवाल यांना बरोबर घेत तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला. किती झाडे तोडली, त्यातील किती चोरून नेली, त्यांचे मूल्य किती, याचा अहवाल तयार केला. त्यानंतर नजान यांनी बुधवारी (ता. २५) रात्री उशिरा संबंधितांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात झाडे चोरी करणे तसेच झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) नुसार गुन्हा दाखल केला.

असा केला पंचनामा

नजान यांनी वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य, पिंपळगाव माळवीचे काही स्थानिक नागरिक, तसेच मनपा कर्मचाऱ्यांना सोबत घेत तोडलेली झाडे मोजली. त्यात बाभळीची ९५, लिंबाची २४, शिरीश सहा व एका आंब्याच्या झाडाचा समावेश होता. प्रत्येक झाडाच्या खोडावर क्रमांक टाकले, त्याचे फोटो या सर्व बाबी तपासून त्याचा अहवाल तयार केला. त्यावर आयुक्तांची सही झाल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली.

पुरवणी फिर्याद द्या

वृक्षतोड करणाऱ्या आरोपींच्या विरोधात दोनच कलमे लावली आहेत. झाडे तोडणे हा गंभीर गुन्हा आहे. कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे आरोपींवर आणखी कलमे लागली पाहिजेत. त्यासाठी मनपाच्या पॅनलवरील वकिलांचा सल्ला घेऊन आरोपींच्या विरोधात पुरवणी फिर्याद द्यावी, अशा सूचना स्थायी समितीच्या सभेत सभापती कुमार वाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वृक्षतोड हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणी लावण्यात आलेली कलमे पुरेशी नाहीत. त्यामुळे आरोपींच्या विरोधात हरित लवादाकडे तक्रार करणार आहे. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून पुन्हा कोणी वृक्षतोड करू नये.

- सुरेश खामकर, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT