मागणीसाठी आज माजी महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे यांनी संबंधित गावांतील महिलांसह जिल्हा परिषद गाठली. sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : गावे तहानली; पाणीयोजनेत घ्या

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना निवेदन, महिलांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपूर व लखमापुरी (ता. शेवगाव) ही गावे तहानली आहेत. येथील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी बोधेगाव प्रादेशिक योजनेत त्यांचा समावेश करा, या मागणीसाठी आज माजी महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे यांनी संबंधित गावांतील महिलांसह जिल्हा परिषद गाठली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता मुळे यांना त्यांनी मागणीचे निवेदन देऊन, या प्रश्नांचे गांभीर्य समजावून सांगितले. या वेळी महिलांना पाणीप्रश्‍नावर आक्रोश व्यक्त केला. या वेळी जिजाबाई जाधव, लताबाई लोहकरे, पार्वती पोकळे, ऊर्मिला जाधव, अनिता जाधव, लंकाबाई भारस्कर, सकूबाई जाधव, रुक्मिणी काकडे, मीरा तेलोरे, विमल काळे, शीलाताई गोरे, मंगल पातकळ, मंगल तेलोरे, भीमाबाई पठाडे, शीला तेलोरे, भगवान शेळके, मोहन गवळी, महादेव पातकळ, दीपक शिंदे, अशोक दातीर आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

शेवगाव तालुक्यातील बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपूर व लखमापुरी या गावांचा हातगावसह २८ गावांचा पाणीयोजनेमध्ये समावेश होता. त्यानुसार वरील गावांत काही ठिकाणी टाक्या वगैरे बांधून खूप दिवस झाले; परंतु गावांना पाणी मिळालेले नसून, या गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. या गावात कुठेही पाण्याचा स्रोत नसल्याने शाश्‍वत पाणी मिळण्यासाठी बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेशिवाय पर्याय स्पष्ट करण्यात आले आहे.

त्या गावांचा ठराव

या चारही गावाच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव करून या गावांना हातगावसह २८ गावांची पाणीयोजनेमध्ये राहायचे नसल्याचा निर्णय घेतला आहे. ही गावे या योजनेतून बाहेर पडलेली आहेत. गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी नसून, पाण्यासाठी महिलांसह लहान मुलांना वणवण हिंडावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या गावांचा बोधेगाव प्रादेशिक पाणीयोजनेत समावेश केल्यास त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. बोधेगाव पाणीयोजना ज्या ठिकाणावरून जाते, त्या रस्त्यालगतच ही गावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT