ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : त्यांनी गणेश चालविला, हाताला काय लागले ;आर्थिक शिस्त लावून कारखाना चालवून दाखवू - बाळासाहेब थोरात

राजकारण शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी असावे. येथे मात्र गणेशपुढे अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - ऊस आणि भरपूर पाणी असताना त्यांनी आठ वर्षे गणेश कारखाना चालविला. फायदा काय झाला अन्‌ हाताशी काय लागले तर त्यांनी (महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील) गणेशवर बहात्तर कोटी रुपयांचा बोजा असल्याचा दावा केला. आम्ही येथे आल्याने देवदर्शनाच्या सहली सुरू झाल्या, अशी टीका माजी महसूलमंत्री व गणेशचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केली.

राजकारण शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी असावे. येथे मात्र गणेशपुढे अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे. मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आणि युवा नेते विवेक कोल्हे (कै.) शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. आम्ही आव्हान स्वीकारले आहे. आर्थिक शिस्त लावून गणेश कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू, असा विश्‍वासही थोरात यांनी व्यक्त केला.

गणेश कारखान्याच्या वार्षिक सभेत थोरात बोलत होते. कारखान्याचे मार्गदर्शक युवा नेते विवेक कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक नितीन भोसले, ॲड. नारायण कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, भगवान टिळेकर, गंगाधर चौधरी, महेंद्र शेळके, सुहास वहाडणे, शिवाजी लहारे, सर्जेराव जाधव व संचालक मंडळातील सदस्य आणि सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, की थोरात-कोल्हे युती ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ असा संदेश देते. (कै.) शंकरराव कोल्हे यांनी परिसरात दोनशे गणेश बंधारे बांधले, तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माणसे अडवा आणि माणसांची जिरवा असा कार्यक्रम आहे. गोदावरी दूध संघ आणि मागील विधानसभा निवडणुकीत त्याचा अनुभव आम्हाला आला. गणेशच्या ५३ हजार साखर पोत्यांची जी.एस.टी. न भरता विक्री झाली.

राहुरी कारखान्याला गणेशचे पाच कोटी ४६ लाख रुपये दिले. बॉयलर, टर्बाईन विक्री व मोलॅसेस विक्रीचा ताळमेळ लागत नाही. तरीही आम्ही यावर काही न बोलता गणेश चालविण्याचे ठरविले. ते सहकार्य करणार म्हणाले, मात्र प्रवरेने पत्र दिल्याने जिल्हा बॅंकेने गणेशचे कर्ज रोखले. साखर आयुक्तांनी प्रवरा कारखान्याला गणेशकडून ७२ कोटी रुपये घेणे असल्याचे पत्र दिले. त्याबाबत वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ. कोल्हे आणि थोरातांची जिरविण्याच्या नादात गणेश परिसराची जिरवू नका.

चर्चेत सुधीर लहारे, सर्जेराव जाधव, डॉ. एकनाथ गोंदकर, दिलीप सातव, ज्ञानेश्वर वरपे, संजय सरोदे, अविनाश दंडवते, शिवशंकर कार्ले, नानासाहेब शेळके, दिलीप क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला.

सभेतील मंजूर ठराव

गणेशवरील ७२ कोटींचा बोजा मंजूर नाही

गणेश व प्रवरा कारखान्यात एकाच कार्यकारी संचालकांना कारभार पाहता येत नाही.

गेल्या आठ वर्षांत त्यांनी गणेशचे हित पाहिले नसल्यास कारवाई करावी.

साखर व मोलॅसेस विक्रीतून सोळा कोटी रुपये मिळाल्याचे अहवालात नमुद करण्यात आले, त्याची चौकशी व्हावी.

कच्च्या साखरेची विक्री कमी दराने आणि निविदा न मागवता केली का याची, तसेच दोन बॉयलर व टर्बाईन विक्रीची चौकशी व्हावी

यापूर्वीच्या संचालक मंडळाने प्रवरेसोबत करार करण्याचा केलेला ठराव रद्द करावा.

लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार संबंधितांवर कारवाई केली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT