In Ahmednagar, young women are on a hunger strike in front of the Zilla Parishad demanding computer operators.jpg 
अहिल्यानगर

संगणक ऑपरेटरच्या मागण्या सोडवण्यासाठी तरुणींचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या तरुणांच्या मानधनात वाढ करावी, यासह विविध मागण्यासाठी नगर येथील जिल्हा परिषदेच्या आवारात राज्यातील संगणक ऑपरेटरचे प्रतिनिधी म्हणून सोनू मोहन तिरमारे (नागपूर) व सुनिता विठ्ठल वाणी (नगर) या दोन तरुणींनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मुंबई, पुण्यात उपोषणाला परवानगी मिळत नसल्याने त्यांनी नगरची निवड केली आहे. दोन दिवसापासून उपोषण करत असूनही मंगळवारी उशिरापर्यत जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नाही.

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार सोपा आणि सुलभ व्हावा, यासाठी २७ हजाराच्या जवळपास संगणक ऑपरेटर ११ वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने केल्या जात आहेत. संगणक ऑपरेटरला महिन्याला केवळ सहा हजार रुपयाचे मानधन दिले जाते. त्यात किमान दुप्पट वाढ करावी, मानधन विशिष्ठ तारखेला दयावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, कामावरुन विनाकारण कमी केलेल्या ऑपरेटरला पुन्हा कामावर घ्यावे या मागण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून संगणक ऑपरेटर पाठपुरावा करत आहेत. मात्र मानधनात दुप्पट वाढ करण्यासह गण्याची दखल घेतली जात नाही. 

सध्या कोरोनाचा काळ असल्याने पुणे, मुंबईत उपोषणाला परवानगी मिळत नाही. मानधन वाढीसह शासनाने राज्यातील संगणक ऑपरेटरचे प्रश्न सोडवावेत यासाठी राज्यातील संगणक ऑपरेटर प्रतिनिधी म्हणून सोमवारपासून नगर जिल्हा परिषदेच्या आवारात सोनू मोहन तिरमारे (नागपूर) व सुनिता विठ्ठल वाणी (नगर) या दोन तरुणींनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस असूनही जिल्हा परिषद प्रशासनाने त्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi big Statement on Congress : बिहारच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमधील मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

मोदींची ‘गमछा सिग्नेचर स्टाईल’ परत एकदा चर्चेत! बिहार निकालानंतर अनोखा अंदाज व्हायरल, ‘गमछा वेव्ह’चा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंग

Bihar Election Result 2025 Live Updates : सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही निवडणूक जिंकली, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Mohol Agriculture : यंदा ज्वारीची भाकर महागणार; मोहोळ तालुक्यात ज्वारीची केवळ 24 टक्केच पेरणी!

Latest Live Update News Marathi: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत

SCROLL FOR NEXT