social work  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : युवक चळवळीतून परिवर्तन घडणार- आमदार संग्राम जगताप

सामाजिक कार्यासाठी युवा एक साथ फाउंडेशनने सुरू केलेली चळवळ प्रेरणादायी आहे. प्रत्येक महिन्यात सामाजिक उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मदत पोहचविण्याचे कार्य फाउंडेशनच्या युवक-युवती करत आहेत

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सामाजिक कार्यासाठी युवा एक साथ फाउंडेशनने सुरू केलेली चळवळ प्रेरणादायी आहे. प्रत्येक महिन्यात सामाजिक उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मदत पोहचविण्याचे कार्य फाउंडेशनच्या युवक-युवती करत आहेत.

युवकांनी समाजातील गरजू घटकांसाठी चालविलेल्या चळवळीतून परिवर्तन घडणार आहे, अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

समाजातील गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या युवा एक साथ फाउंडेशनने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकास व्हीलचेअर भेट दिली.

आमदार जगताप यांच्या हस्ते ही भेट युवकास देण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, सचिव साईराज चव्हाण, खजिनदार महेश साठे, कार्याध्यक्ष ओंकार पागावाड, मार्गदर्शक योगेश ठुबे, चंद्रकांत काळोखे, नितीन साठे, संतोष ढाकणे, प्रदीप वाघचौरे, राज जाधव,

टेरी वाघमारे, प्रिया घायतडक, सुमित भिंगारदिवे, यश शेकटकर आदी उपस्थित होते. शिवाजीनगर येथे राहात असलेला युवक गणेश चुकाटे याला चालता येत नाही. या होतकरु युवकाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

Video Viral: अरर... मुंबई इंडियन्सचा फॅन स्टेडियममध्ये गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, पण अंगठीच हरवली अन् फजिती झाली

ही होती पहिला किसिंग सीन देणारी भारतीय अभिनेत्री; दिग्दर्शक नवऱ्याला फसवून सिनेमाच्या हिरोसोबत गेली पळून

झी मराठीच्या 'लक्ष्मीनिवास' आणि 'सावल्याची जणू सावली' मालिकांची वेळ बदलणार; कधी पाहता येणार? प्रेक्षक मात्र नाराज

SCROLL FOR NEXT