Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ladki Bahin Yojana August Installment: 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana August Installment

Ladki Bahin Yojana August Installment

ESakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने 'लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होत होता. सप्टेंबर महिना संपण्यास अवघे ३ दिवस शिल्लक राहिले असताना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र योजनेतील पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com