IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

India vs West Indies 1st ODI, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पहिला वनडे सामने तिरुअनंतपुरम येथे होत आहे. या सामन्यात नमन धीरला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
Naman Dhir Debut | India vs Wst Indies 1st ODI

Naman Dhir Debut | India vs Wst Indies 1st ODI

Sakal

Updated on: 

India vs West Indies 1st ODI, Toss & Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिरुअनंतपुरम येथे वनडे मालिकेतील पहिला सामना आज (रविवारी, २७ सप्टेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यापासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे.

याशिवाय ८ महिन्यांनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र मायदेशात खेळताना दिसणार आहेत. ही मालिका २०२७ वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Naman Dhir Debut | India vs Wst Indies 1st ODI
IND vs WI: आज रंगणार पहिला वनडे! यशस्वी जैस्वालला रोहितसोबत ओपनिंगला संधी मिळणार? कुठे पाहाणार सामना, जाणून घ्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com