Ahmednagar Zilla Parishad headquarters closed
Ahmednagar Zilla Parishad headquarters closed 
अहमदनगर

नगर जिल्हा परिषद कोरोनाने हैराण...आठ दिवस मुख्यालय बंद

दौलत झावरे

नगर : कोरोना विषाणूने जिल्हा परिषदेला चांगलाच वेढा घातलेला असून तीन अधिकाऱ्यांसह सात कर्मचाऱ्यांना अशा एकूण दहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेतील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

या आठ दिवसात अतिमहत्वाची कामे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी "वर्क फ्रॉर्म होम'ने करावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागातर्फे देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा जसा आकडा वाढत चालला आहे. तसाच आकडा आता जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्येही वाढत चालला आहे. जिल्हा परिषदेतील शनिवारपर्यंत दोन अधिकारी व चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेले होते. त्यातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. एका कर्मचाऱ्याला घरीच त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचार सुरु असतानाच जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे.

संबंधित कर्मचाऱ्या स्त्राव घेण्यात आलेला असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने त्यांना कोरोना झाला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोनाची लक्षणे त्यांना रुग्णालयात दाखल करताना दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, जिल्हा परिषदेत कोरोना बाधीतांच्या संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाने आणखी आठ दिवस कामकाज बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सोमवार (ता. 10) पासून कामकाज सुरु करण्याबाबतचा निर्णय रविवारी परिस्थिती पाहून घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी माहिती दिली. 

जिल्हा परिषदेत कर्मचारी बाधीत सापडू लागल्यामुळे प्रशासनाने आठ दिवसांसाठी कामकाज बंद ठेवलेले आहे. महत्वाची कामे अधिकारी व कर्मचारी वर्क फॉर्म होम करणार आहेत. 
-वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. 

 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT