police logo 
अहिल्यानगर

नगरकरांनी अनुभवला खाकीतील ओलावा

सूर्यकांत वरकड

नगर : विविध घटनांनी राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नगर जिल्ह्यात सरत्या वर्षात खाकी वर्दीतील माणुसकी दिसून आली. पोलिस दलासह सामाजिक संस्थांनी त्यासाठी मोठे योगदान दिले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची दखल घेत, नगरच्या पोलिसांचे कौतुक केले. कोरोनामुळे गुन्हेगारीला आळा बसला. मात्र, लॉकडाउनमधून शिथिलता दिल्यावर गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले.

वर्षाच्या सुरवातीला जानेवारी, फेब्रुवारीत किरकोळ घटना घडल्या. कोरोनामुळे मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे आरोपींच्या शोधात राहणारा पोलिसदादा कोरोनापासून सामान्यांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर आला. स्वत:चा जीव धोक्‍यात घालून सेवा केली.

विशेष म्हणजे, त्यात काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले, तरी पोलिसांनी सेवेत खंड पडू दिला नाही. लॉकडाउनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली, तेव्हा पोलिसच मदतीला धावले.

समाजसेवी संस्थांच्या मदतीने वंचितांच्या घरी जाऊन किराणा दिला. स्थलांतरित वाटसरूंना जेवण दिले. अन्नछत्र चालवून अनेकांचे सण-उत्सव गोड केले. शहर विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात आले.

घर घर लंगर, आनंदधाम फाउंडेशन, समस्त जैन समाज, लाल टाकी सेवा मंडळ, बन्सी महाराज अन्नपूर्णा आदी संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. त्यासाठी पोलिस अक्षरक्ष: "पोस्टमन' झाले. अगदी मुक्‍या जनावरांनाही पोलिसांनी घास भरविण्याचे काम केले.

लॉकडाउनमध्ये ग्रामीण भागात बांधावरून वाद, भावकीतील वादाचे प्रकार समोर आले. अपत्य जन्माबाबतच्या वक्तव्यावरून निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू झाला. नेवासे तालुक्‍यातील वकिलांच्या हत्येने जिल्हा ढवळून निघाला. लॉकडाउनमधून शिथिलता मिळताच, गुन्हेगारीही वाढली.

ऑडिओ प्रकरणाची चर्चा
जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे ऑडिओ क्‍लिप प्रकरण चांगलेच गाजले. डॉ. राठोड यांची त्यातून बदली झाली. डॉ. राठोड यांच्या विशेष पथकाने बनावट डिझेलचे टॅंकर पकडले. त्यात संपूर्ण पथकच निलंबित झाले.

वंचितांची चूल पेटवली
लॉकडाउनमध्ये 25 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पोलिस दलाने वंचितांच्या घराची चूल पेटवली. गरजूंना किराणा साहित्यांचे 7660 किट वाटले. घर घर लंगर, आनंदधाम, समस्त जैन, लाल टाकी सेवा मंडळ, बन्सी महाराज अन्नपूर्णा मंडळाच्या मदतीने नगर शहर व परिसरातील गरजूंना 7 लाख 36 हजार 212 अन्नपाकिटे वाटली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT