ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagr : वीस हजार विद्यार्थ्यांनी घरबसल्या दिली परीक्षा ; ऑनलाइन शिष्यवृत्ती सराव चाचणीस उदंड प्रतिसाद

पालकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांना टेस्ट सोडविता यावी, यासाठी ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेसात ते नऊ व एक ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते साडेनऊ असा सोयीचा ठेवला होता.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत अहमदनगरचे जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम सुरू आहेत. त्यासाठी विविध सराव परीक्षा घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी घरबसल्या सरावपरीक्षा ऑनलाइन दिली.

पालकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांना टेस्ट सोडविता यावी, यासाठी ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेसात ते नऊ व एक ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते साडेनऊ असा सोयीचा ठेवला होता. यामध्ये इयत्ता पाचवी मराठी माध्यमाच्या १२ हजार ६३०, उर्दू माध्यमाच्या ९०० व इयत्ता आठवीच्या ६ हजार ५४० विद्यार्थ्याचा समावेश आहे. जिल्हा परिषद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अगोदरच इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रत्येकी ३० ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून दिल्या आहेत.

परीक्षा यशस्वीतेसाठी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विस्तार अधिकारी मनीषा कुलट, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, तंत्रस्नेही शिक्षक बाबासाहेब पवार, मिलिंद जमादार, तसेच जिल्हा आयटी समन्वयक रवी भापकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रश्नसंच निर्मितीसाठी सचिन शिंदे, सतीश भालेकर, विजय गुंजाळ, अफसाना तांबोळी, मीना निकम, अंजुम तांबोळी, शेख जमीर अहमद याकूब, डी. डी. चव्हाण, नीलेश थोरात, भागिनाथ बडे, नामदेव धायतडक, रामकिसन वाघ. या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. नवोदयसाठीही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी निवडले गेले होते.

सीईओंची संकल्पना

ऑनलाईन चाचणीनंतर डिसेंबर महिन्यापासून सर्व अभ्यासक्रमावर आधारित चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीमुळे सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. चाचणी आणि अध्यापनाचे सर्व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेनुसार ही सराव परीक्षा घेतली जात आहे.

परीक्षेचा निकाल शिक्षण विभागाच्या https://www.eduprimaryanagar.in/p/blog-page_85.html या संकेतस्थळावर घोषित केला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आपापल्या निकालाची पडताळणी करू शकतात. अशा प्रकारची परीक्षा घेणारी नगर जिल्हा परिषद राज्यात पहिली आहे.

भास्कर पाटील,

शिक्षणाधिकारी प्राथमिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

SCROLL FOR NEXT