अजित पवार sakal
अहिल्यानगर

नगरचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना द्यावे ; ऊसतोड संघटनेची मागणी

ऊसतोडणी कामगार मुकादम युनियनची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बदलण्याच्या हालचाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नांसह जिल्ह्यातील प्रमुख प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे द्यावे, अशी मागणी राज्य ऊसतोडणी कामगार मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी केली. या बाबत माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.

थोरे - पाटील म्हणाले, ‘‘नगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतील कामाचा ताण अधिक होत आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन पाकलमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. हे मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होत असले, तरी त्यांच्या गावी अनेक समस्या आहेत. या समस्या अजित पवार सोडवू शकतात. या शिवाय त्यांना ग्रामीण भागातील अनेक बाबींची जाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न ते मार्गी लावतील. त्यामुळे नगरचे पालकमंत्रिपद पवार यांना द्यावे, अशी मागणी आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Pasand: दोघात तिसरी..! 'कमला पसंद' कंपनीच्या मालकाच्या सुनेने दिला जीव; चिठ्ठीमध्ये नेमकं काय?

T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Latest Marathi News Live Update: करवाढीवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

SCROLL FOR NEXT