Leopard  Sakal
अहिल्यानगर

Leopard : राजूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ

शेळी, कुत्र्यांचा फडशा ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा

अकोले : तालुक्यातील कोकणवाडी येथील आदिवासी महिलेस बिबट्याने ठार केल्यानंतर सातत्याने बिबट्याची दहशत सुरू आहे. तीन ते चार बिबटे परिसरात फिरत असून, सोमवारी मध्यरात्री बिबट्याने राजूर येथे एक शेळी व एका कुत्र्याचा फडशा पाडला. राजूर येथे बिबट्याने गावातील गणपती मंदिरामागील वस्तीत प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला आहे.

निळवंडे, चितळवेढा परिसरात उसाची शेती असल्याने, लपण्यासाठी मुबलक जागा असल्याने परिसरात बिबटे आढळून येतात. सायंकाळी सहा वाजता बिबटे रस्त्यावर दिसू लागले आहेत. शेळ्या, कोंबड्या, जनावरे व माणसांवर चाल करत आहेत. गणपत देशमुख हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना त्यांच्या कळपातील एक शेळी त्याने पळवून नेली. वन विभागाने, पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले, मात्र तसे पाऊल उचलण्यात आले नाही.

चितळवेढा घाट पार करून बिबट्या काल मध्यरात्री राजूर शहरात पोचला. कंपाउंडवरून उडी मारून त्याने विमा प्रतिनिधी गिरीश बोराडे यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला, तर गणपती मंदिर परिसरातील स्वप्नील काळे यांच्या घराबाहेर सावज शोधत होता. मात्र, त्यांच्या कुत्र्याला चाहूल लागताच त्याने जोरजोरात भुंकण्यास सुरवात केली. त्याच वेळी परिसरातील दहा बारा कुत्र्यांनी एकत्र येत बिबट्याचा समाचार घेतला, त्यामुळे त्याने धूम ठोकली. मातोश्री राइस मिलकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

'मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला होता. कारण...' रितेश देशमुख म्हणाला, 'सेट उभा करण्यासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : अमरावतीत स्कूलबसच्या भाड्यात २५ टक्के वाढ

बेटा तुला डॉक्टर व्हायचं बेटा... RCC च्या शिवराज मोटेगावकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलासाठी कसा मिळवला NEET पेपर? मोठं नाव समोर

Hasan Mushrif : साखर कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ, मुश्रीफ असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT