akole ajji. 
अहिल्यानगर

अय्या नवलंच... ! तरुणींना लाजवेल असा उंच झोका घेतला या आज्जीनं 

शांताराम काळे

अकोले (नगर): १०० वर्षांपासूनची नागपंचमीची परंपरा कायम ठेवत ढोकरी तालुका अकोले येथील शांताबाई मोहना पुंडे वय ८२ व चंद्रभागा नामदेव पुंडे वय ८७ या दोघी आज्जीनी तरुणींना लाजवेल असा उंच माझा झोका म्हणत... झोका खेळण्याची आपली परंपरा कायम ठेवली. त्यांच्या घरासमोर १२० वर्षाचे जुने चिंचेचे झाड असून त्यावर दर वर्षी झोका बांधला जातो. पारंपरिक पद्धतीने झोका खेळण्याची आमच्या घराची प्रथा असल्याचे आजी बाईंनी सांगितले. 

घरातील प्रत्येक माणसांनी किमान ५ झोके खेळण्याची प्रथा असल्याने आम्ही ही दर वर्षी खेळत असतो. सध्या कोरोनामुळे सर्वच घरी असल्याने आजीचे १५ नातवंडे ही घरात असल्याने आजी बाईसह सर्वजण झोका खेळण्यासाठी सहभागी होतात. 'सकाळ' शी बोलताना आज्जीनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

सध्याच्या काळात सिमेंटच्या जंगलातील बंगल्यात झोपाळा असल्याने आता झाडाच्या झोक्यास महत्व नसल्याचे आज्जीनी सांगितले. तर नव्या पिढीला हे  संस्कार देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शांताबाई सांगत होत्या. तर चंद्रभागाबाई म्हणाल्या, ज्यावेळी आम्ही सून म्हणून आलो. तेव्हा गावातील महिला पुरुष आमचा झोका पाहण्यास यायची. जत्रेचे स्वरूपच बनले जायचे. आमच्यामुळे गावात अनेक ठिकाणी महिला झोका खेळू लागल्या, पुरुषही झोका खेळू लागले.  झोका हा व्यायामाचा प्रकारचं आहे. झोका हा केवळ नागपंचमीलाच नाही तर तेथून पुढे आठ दिवस हा खेळ चालत असे, त्यामुळे झोका हा पंचमीला आमच्या मुली नातवंडे हमखास गावाला यायची.

आमचे कुटुंब मोठे आहे मग काय पुरणपोळीचा बेत, सार, भज्जी याचा बेत असायचा, मात्र अलीकडची तरुण पिढी शहराकडे नोकरीनिमित्त गेल्याने ही झोका संस्कृती बंद पडू लागली आहे. तिच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत फोफावली होती. मात्र आज मुले आई वडीलापासून विभक्त झाल्याने एकत्र कुटुंब दिसत नाहीत, असेही आज्जी म्हणाल्या. कालबाह्य झालेली संस्कृती जोपासण्याचे काम आमची आज्जी करत असल्याचे आजीचे नातू पंकज रेवगडे व सात्विक पुंडे यांनी सांगितले

संपादक- सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT