All schools except 10th-12th will be closed 
अहिल्यानगर

दहावी-बारावीवगळता सर्व शाळा बंद, सरकारचा नवा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यातील दहावी व बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना साथीची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर बाबासाहेब वाकळे, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन सहायक उपायुक्‍त अशोक राठोड आदींची उपस्थित होते. 

त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील उपाययोजनांची माहिती दिली. पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी यासाठी केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले. 
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात काही खासगी रुग्णालयांकडून वाढील बिले आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची शहानिशा करुन अशा प्रकरणी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

लॉकडाउन अंतिम उपाय 
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक सर्वांनीच याबाबत मास्कचा आग्रह धरला पाहिजे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केल्यास कोरोना साथ नियंत्रणात येईल. अन्यथा लॉकडाऊन हा अंतिम उपाय आहे. प्रशासनाने जारी केलेल्या उपाययोजनांचा अंगीकार सर्वांनी जबाबदारीने करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT