All the water in the Ujani dam will run out this year All the water in the Ujani dam will run out this year
अहिल्यानगर

उजनी धरण यंदा तळ गाठणार

110 टक्के भरूनही मोठ्या प्रमाणात झाला उपसा

अशोक निंबाळकर

सिद्धटेक : नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या दोन तालुक्यातील सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या उजनी धरणातील पाणीपातळी सध्या खालावते आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची वाढती मागणी तसेच हवामान विभागाने यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने उजनीतील पाणी यंदा घटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

गतवर्षीच्या पावसामुळे उजनी धरण ११० टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, सध्या सर्वत्र पाण्याची वाढती मागणी आहे. त्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असून अनेक पाणी योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी खर्ची होत आहे. त्याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणी साठ्यात घट होत आहे. सध्या धरणात एकूण ७७.९७ टीएमसी म्हणजेच २६.७१ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १४.३१ टीएमसी असून गतवर्षी यावेळी हा साठा २० टीएमसी होता. आणखी सुमारे दोन महिने हा साठा वापरायचा असल्याने जपून पाणी वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

धरणातील पाण्याची स्थिती

सध्या धरणात ७७.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. परंतु त्यात १४.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याने व जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यास शेतकरी तसेच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यातच धरणातून सध्या ४३४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बातमीदार - सचिन गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT