Allocation of space without permission of onion traders 
अहिल्यानगर

कांदा व्यापाऱ्यांना परवानगी न घेताच जागा वाटप, माजी सभापतीचीच तक्रार

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः येथील बाजार समितीने पणन संचालकांची परवानगी न घेता कांदा व्यापाऱ्यांना वितरित केलेली जागा त्वरीत रद्द करुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती सचिन गुजर यांनी केली आहे.

या संदर्भात गुजर यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली. असुन आमदार लहु कानडे यांनाही तक्रारीची प्रत पाठविली आहे. पणन संचालकांची परवानगी न घेता येथील बाजार समितीने चार ते पाच कांदा व्यापार्यांना परस्पर जागा वितरीत केल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे.

संबधित व्यापार्यांनी दोन दिवसांपुर्वी त्याठिकाणी आखनी करुन शेड उभारण्यास प्रारंभ केला. असुन बाजार समितीच्या जागा विना परवानगी देण्यास सरकारची बंदी असताना बाजार समितीने कांदा व्यापार्यांना जागा वाटप केली. 

संचालक मंडळाची सद्या मुदत संपलेली असुन उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीच्या काळात सदरची जागा वितरित केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी गुजर यांनी केली आहे. बाजार समितीचा आराखडा मंजुर असताना त्यातील तरतुदीकडे करून दुर्लक्ष करुन मर्जीतील काही व्यापार्यांना जागा वाटप केल्याचा सवाल गुजर यांनी उपस्थित केला आहे.

बाजार समितीने वितरित केलेली जागा त्वरित रद्द करुन बाजार समिती व्यवस्थापनावर कायेदेशीर कारवाईची मागणी गुजर यांनी तक्रारीत नमुद केली आहे. दरम्यान, लाॅकडाउन शिथिल झाल्यानंतर कांद्याची आवक वाढल्याने माल ठेवण्यासाठी व्यापार्यांची गैरसोय होत होती.

सोशल डिस्टसिंच्या नियमांचे पालनासाठी तात्पुर्त्या स्वरुपाचे शेड टाकण्यासाठी व्यापार्यांना जागा दिली आहे. यासंदर्भात संचालक मंडळाने तसा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT