babasaheb gadalkar 
अहिल्यानगर

कोरोना बरोबरच या साथींचाही नगरकरांना धोका

अमित आवारी

नगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता शहरात मलेरिया, डेंग्यू आजाराचीही निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने साथरोग नियंत्रणाची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली. तसेच साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा केली. 

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूने थैमान घातले आहे. शहरातील सर्व भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत.

या काळात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती निर्माण होत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरियाची साथ निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे. मागील वर्षी नगर शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाची साथ निर्माण झाली होती. त्यातून नागरिकांचा मृत्यूही झाला होता. असा प्रकार पुन्हा नगर शहरात होऊ नये याची दक्षता या वर्षात घेण्यात यावी. यासाठी नगर शहरातील सर्व भागांमध्ये औषध व धूर फवारणी करण्यात यावी.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये या दृष्टीने महापालिका प्रशासनाने उपाय योजना कराव्यात अन्यथा कोरोना बरोबरच शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ निर्माण होईल. तरी लवकरात लवकर प्रशासनाने उपाय योजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना मळू गाडळकर, अमित औसरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीमाशंकरमध्ये खरंच झाडांची कत्तल? व्हायरल व्हिडीओनंतर वनविभागाचं मोठं स्पष्टीकरण

Brazil Election : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! ब्राझीलमध्ये फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव करत लुला चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी

Livestock Insurance Scheme : पशुधन विम्यासाठी आता 85 टक्के अनुदान; एका कुटुंबातील 10 जनावरांना मिळणार विमा संरक्षण, पशुपालकांना मोठा दिलासा

Maharashtra Live News : कर्जत- टोरेंट पॉवर प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक, आज दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे करणार पाहणी

Jio IPO Allotment Status: जिओचे शेअर्स मिळाले की नाही? एका क्लिकवर चेक करा स्टेटस; लिस्टिंग कधी? पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT