An alternative to the PPE kit invented
An alternative to the PPE kit invented 
अहमदनगर

शाळेत क्वारंटाईन शिक्षकाने तोडली बेंच, आता निघाला पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोले : मुंबईहून लिंगदेवला आलेला शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे शिक्कामोर्तब झाले. दोन दिवसांपूर्वी या शिक्षकाचा अहवाल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. परंतु तो खासगी रूग्णालयातील असल्याने प्रशासाने पुन्हा त्याची तपासणी केली. त्या शिवाय, ढोक्री येथील प्रवासी रुग्णही बाधित निघाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. 

मुंबईहून लिंगदेव येथे आलेल्या शिक्षकास संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. दहा दिवसांनंतर त्यास घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर, त्याला घशात त्रास जाणवू लागला. लिंगदेव येथील खासगी दवाखान्यातून त्यास संगमनेरला पाठविले. तेथून त्याच्या घशातील स्राव मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पाठविला असता, 23 तारखेला तो पॉझिटिव्ह आला. मात्र, तालुका प्रशासनाने, सरकारी अहवालाशिवाय निश्‍चित सांगता येणार नाही, अशी भूमिका घेतली. शिक्षकासह 11 नातेवाइकांना नगरला पाठविले. काहींना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले. नगरलाही शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्हच आला.

दरम्यान, मुंबईहून ढोक्री येथे आलेल्या 35 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. या रुग्णाचा इतरांशी संपर्क आला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मात्र, लिंगदेव येथील शिक्षकाचा 10 ते 12 जणांशी संपर्क आल्याने संबंधितांना नगरला पाठविले आहे. अजून 10 अहवाल आलेले नाहीत.

मुंबईतून येणारे लोंढे थांबविणे अशक्‍य असून, सरपंच व समितीवर जबाबदारी ढकलून प्रशासन बाजूला होत असल्याने माजी आमदार वैभव पिचड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लिंगदेव येथील रुग्णाने गोंधळ घातल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे अाहे. त्याने शाळेतील बेंच मोडल्याची चर्चा आहे. शिक्षक असूनही तो असे कृत्य करीत असल्याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रशासनाचे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवरील नियंत्रण सुटत चालल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT