women 
अहिल्यानगर

क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या 'या' जिल्ह्यात महिलांचे प्रमाण मात्र कमीच...

अशोक मुरुमकर

अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,०४८ चौरस किलोमीटर आहे. भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्येही या जिल्ह्याला लाभलेले आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाख ४३ हजार १५९ आहे.

राज्यांच्या मदतीने केंद्र सरकार १० वर्षांनी जनगणना करते. याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. २०११ मध्ये अशी जनगणना घेण्यात आली. लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते.

महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  २०११  च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२ इतकी आहे. यामध्ये ५१.९ टक्के पुरुष व ४८.१ टक्के स्त्रिया आहेत.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे चार कोटी होती. त्यानंतर उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.

दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. २००१ ते २०११ या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग १५.९९ टक्के आहे.

महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ९४ लाख २६ हजार ९५९ आहे. सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख ६८ हजार ८२५ आहे. मुंबईची लोकसंख्या ९३ लाख ५६ हजार ९६२ आहे. नाशिकची लोकसंख्या ६१ लाख सात हजार १८७ आहे. यामध्ये पुरुषांची संख्या ३१ लाख ५७ हजार १८६ आहे. महिलांची संख्या २९ लाख ५० हजार एक आहे.  लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो. अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाख ४३ हजार १५९ आहे. त्यात २३ लाख ४२ हजार ८२५ पुरुष तर २२ लाख ३३४ महिला आहेत.

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT