Ambadas Pisal has won from Karjat Taluka Society constituency of District Bank by one vote 
अहिल्यानगर

काँग्रेसच्या शेवाळेंनी मतदान केलं नाही, भाजपचे पिसाळ एका मताने विजयी

नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर)  : जिल्हा बँकेच्या कर्जत तालुका सोसायटी मतदारसंघातून विखे यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ एका मताने विजयी झाले आहेत.

या मतदार संघाची लढत मीनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ या दोन्ही विद्यमान संचालकांमध्ये झाली. कर्जत सोसायटी मतदारसंघाच्या ७४ मतदारांपैकी ७३ जणांनी मतदान केले होते. मतमोजणीमध्ये अंबादास पिसाळ अवघ्या एका मताने विजयी झालेले आहेत. यामध्ये थोरात समर्थक साळुंके यांचा पराभव झाला. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एड  कैलास शेवाळे यांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत रोहित पवार यांनी लक्ष घातले होते अवघ्या एका मताने झालेला पराभव साळुंके यांच्या जिव्हारी लागला असून यातून भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे.

पिसाळ हे विजयी झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. यामध्ये युवा नेते दादासाहेब सोनमाळी, डॉ. संदीप बरबडे, बंटी यादव आदींचा समावेश होता. विजयानंतर पिसाळ यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. पिसाळ यांचा ठिकठिकाणी सत्कार केला जात आहे.

अंबादास पिसाळ अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. ते विखे यांचे अत्यंत निकटवर्ती व कट्टर समर्थक राहिलेले आहेत.. जिल्हा परिषदेचे सदस्य, जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे.

४० सदस्य सहलीवर नेल्याने साळुंके यांचे पारडे जड वाटत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना फक्त ३६ मते पडली. हा पराभव काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे. विखे गटाची सरशी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. या निवडीने कर्जतमध्ये भाजपाने काँग्रेसला चांगलाच दणका दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

१२ चौकार, १३ षटकार! वैभव सूर्यवंशीच्या भीडूचे ३२ चेंडूंत शतक; राजस्थान रॉ़यल्सचा फलंदाज IPL 2027 मध्ये यशस्वी जैस्वालच्या जागी खेळणार?

Chhatrapati Sambhajinagar: १८ दिवसात २० छापे, कोट्यवधींचा माल जप्त; १४ जणांना अटक, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT