amit thackeray ahmednagar visit change in society developments maharashtra politics mns  sakal
अहिल्यानगर

Amit Thackeray Ahmednagar Visit : जनतेने परिवर्तनासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी; अमित ठाकरे

अमित ठाकरे; मराठी माणसाच्या अस्मितेला ‘मनसे’चे महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जनता वैतागली आहे. जनतेला नवीन पर्यायाची गरज आहे. मराठी माणसाच्या अस्मितेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने महत्त्व दिले आहे. जनतेने परिवर्तनासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.

ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्‌घाटन केले. संस्थेचे पदाधिकारी सुमतिलाल कोठारी,

अजित बोरा, मकरंद खेर, प्राचार्या डॉ. माहेश्‍वरी गावित यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, सुमीत वर्मा, गजेंद्र राशीनकर, चंद्रकांत ढवळे, प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, प्रमोद ठाकूर, स्वप्नील वाघ आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, की सध्याच्या राजकारणाचा दर्जा खालावला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही जण गैरव्यवहारांची चौकशी थांबविण्यासाठी पक्ष बदलत आहेत. सर्वसामान्य जनता या राजकीय चिखलफेकीला वैतागली आहे. जनता आता नवीन पर्यायाच्या शोधात आहे. मनसेने सतत मराठी माणसाच्या अस्मितेला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नवीन नेते तयार होतील.

अभिनव उपक्रमाचे कुतूहल

अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर मोठी गर्दी केली होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. राजकीय नेते जनतेशी कशा पद्धतीने संवाद साधतात,

हे जाणून घेण्यासाठी कुतूहलापोटी आलेल्यांची संख्या मोठी होती. विश्रामगृहातील हॉलमध्ये एका वेळी सुमारे शंभर विद्यार्थ्यांना सोडले जात होते. ठाकरे खुर्चीवर न बसता त्यांच्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणणे ऐकून घेत होते. राजकीय नेता म्हटल्यावर एकतर्फी संवाद, ही संकल्पना त्यांनी मोडून काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT