मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये प्रतिमाणशी पाच किलो धान्य देण्यात येणार आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हे वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांसाठी हा निर्णय लागू असून, राज्यातील ४२ लाख ३० हजार ७६३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.