Amritsagar Co operative Milk Traders and Processing Association has increased the purchase price of milk for the fourth time in the last two months 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात संघाने गेल्या दोन महिन्यात केली चौथ्यांदा वाढ

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात संघाने गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा वाढ करीत शेतकऱ्यांना 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत 30 रुपये प्रति लिटर तर 1 मार्च पासून 31 रुपये लिटर दर देण्यात येणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले आहे.

अमृतसागर दूधसंघाची संचालक मंडळाची बैठक संघाचे विद्यमान चेअरमन वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यांनतर श्री.पिचड पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक विठ्ठल चासकर, भाऊपाटील नवले, शरद चौधरी, गोरक्ष मालुंजकर, रामदास आंबरे, विठ्ठल डुंबरे, सोपान मांडे, प्रवीण धुमाळ, सुभाष बेनके, बाळासाहेब नवले, रवींद्र हांडे, नंदा कचरे, रेखा नवले, जनरल मॅनेजर डॉ. सुजित खिलारी उपस्थित होते. 

पिचड पुढे म्हणाले, गेल्या दोन महिन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व पशुखाद्य चारा, औषधे यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 ला 3. 5 व 8. 5 दुधासाठी 3 रुपयांनी वाढ करून 26 रुपये खरेदीचा दर केला. त्यानंतर लगेच 1 फेब्रुवारीला 2 रुपयांनी यात वाढ करून 28 रुपये दर वाढ केली. तर 16 फेब्रुवारीला त्यात आणखी 2 रुपयांनी वाढ करून खरेदी दर 30 रुपये केला असून 1 मार्च 2021 पासून 31 रुपये खरेदीने दूध घेणार आहोत, अशीही घोषणा पिचड यांनी यावेळी केली तर याचा लाभ अकोले तालुक्यातील 140 दूध संस्थांना होणार असून 7000 दूधउत्पादकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांनी संघालाच दूध द्यावे. हा जाहीर केलेला दूध दर यामध्ये संस्था कमिशन, अंतर्गत दूध वाहतूक, रिबेट हे अंतर्भूत नसून ते वेगळे असणार आहे. 

दूधसंघाने कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्येही दूधउत्पादक शेतकऱ्यांचे संकलन बंद न ठेवता जास्तीचा 3 ते 4 रुपये भाव जादा दिला आहे. आज पर्यंत कधीही शेतकऱ्यांचे देणे थकविलेले नाही. खाजगी दूध संघानी नेहमीच संघाने जाहीर केल्यावर रिबेट दिले पण खाजगी संघानी आधी कधीच जाहीर केले नाही ते त्यांनी करावे. दूध संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले असून प्रसंगी कर्ज काढून रिबेट देखील दिले आहे. पण यात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी संघ उभा राहिला आहे. दूध पॅकिंग बरोबरच दुग्धजन्य पदार्थांची दर्जेदार निर्मिती करीत अगस्ती ब्रँड वाढवला आहे. भविष्यातही इतर प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Koyna Dam Rainfall Eases: कोयना धरण पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर, विसर्गात कपात

Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT